Pune News | मराठा समाज मागासलेपण पडताळणी सर्वेक्षण ! पुणे महापालिकेच्या हद्दीत 14 लाख 30 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune News | मराठा समाजाचे मागासलेपण पडताळण्यासाठी पुणे महापालिकेने तब्बल 14 लाख 30 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण केले. प्रत्यक्षात महापालिका हद्दीमध्ये मिळकत कराच्या नोंदी असलेल्या 12 लाख 50 हजार नोंदीनुसार कुटुंबांची संख्या गृहीत धरून सर्वेक्षणाची आखणी करण्यात आली होती.(Pune News) सर्वेक्षणाच्या उद्दिष्टापेक्षा १०० टक्क्यांहून अधिक कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. (Maratha Survey)

मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य मागासवर्ग आयोगातर्फे मराठा समाजाचे मागासलेपण तपासले जाणार आहे. यासाठी राज्यात मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्या आधारावर आरक्षणाबाबतची कार्यवाही केली जाणार आहे. यासाठी आपापल्या हद्दीत सर्वेक्षण करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोपविण्यात आली होती.

महापालिकेने या सर्वेक्षणासाठी तीन टप्प्यात एकूण ३०५० कर्मचारी नेमले होते. २३ जानेवारी पासून सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला काही ठिकाणी घरे बंद असणे, परवानगी नाकारणे याचबरोबर सर्व्हर, अॅपसंदर्भातील तांत्रिक अडचणी आदी अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतर मात्र, सर्वेक्षणाने वेग घेतला. निर्धारित मुदतीत पालिकेने हे सर्वेक्षण पूर्ण केले, असे महापालिकेच्या मराठा सर्वेक्षणाच्या सह नोडल अधिकारी डॉ. चेतना केरूरे यांनी सांगितले.

महापालिकेने या सर्वेक्षणासाठी मिळकत कराच्या देयकांआधारे १२ लाख ५० हजार कुटुंबांचा आकडा निश्चित केला होता.
प्रत्यक्षात झोपडपट्ट्यांसह अद्याप करनिर्धारण न झालेल्या मिळकतींमध्येही जाऊन सर्वेक्षण केले गेले.
त्यामुळे उद्दिष्टापेक्षा अधिक सर्वेक्षण झाले आहे. पालिकेने सर्वेक्षणासाठी नेमलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या वेळेत
योग्य प्रकारे सर्वेक्षण पार पाडले, असे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पिंपरी : ‘कोई बीच में आया तो…’ हवेत कोयते फिरवून माजवली दहशत, दोघांवर FIR

रस्त्याच्या बाजूला लघुशंका केल्याच्या कारणावरून तरुणावर वार, तीन तृतीयपंथियांवर FIR; दिघी-आळंदी रोडवरील घटना

पिंपरी : सासरच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या, पती व सासु-सासऱ्याला अटक

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल, ”तुमच्याकडे जे बाजरबुणगे आलेत त्यांच्यावरच्या खटल्यांचं काय?”

पिंपरी : भावाला शिवागाळ केल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार