Pune News : सिंहगड रोडपरिसरात विवाहितेची आत्महत्या, पती अन् सासूविरूध्द गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पती अधूनमधून आठ-आठ दिवसांसाठी घरात सोडून जात; तर सासरच्यांनी गर्भपात करण्यास भाग पडल्याने एका विवाहितने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सिंहगड रोड परिसरात हा प्रकार घडला आहे.

नेहा निखिल गरुड (वय 31, रा. रायकरमळा, धायरी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत पती निखिल गरुड तसेच सासू याच्यावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेहा यांची आई साधना जाधव (वय 56) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निखिल व नेहा यांचा दहा ते अकरा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा देखील आहे. तो एका खासगी कंपनीत काम करत. तर नेहा या देखील नोकरी करत होत्या.

दरम्यान आरोपी पती हा फ्लॅट घेण्यासाठी तसेच घर खर्च करण्यासाठी पत्नी नेहा हिचा सतत छळ करत होता. तिला मारहाण देखील करत. त्यांनी जबरदस्तीने नेहा हिला गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यानंतर देखील आरोपी हे तिचा छळ करत होते. या छळाला कंटाळून नेहा हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर तिच्या आईने तक्रार केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक प्रतिभा तांदळे या करत आहेत.