Pune News : हडपसर, रामटेकडी येथील औद्योगिक वसाहतीत (MIDC) भीषण आग; अग्निशमन दलाकडून 11 फायरगाड्या रवाना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील हडपसर भागात असलेल्या औद्योगिक वसाहतीत कंपनीच्या कचरा प्रकल्पाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल व पोलीस दाखल झाले आहेत. यात जिवीत हानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

हडपसरमधील रामटेकडी येथे औद्योगिक वसाहत आहे. कचरा प्रकल्प असून, या कचरा प्रकल्पाला पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती नागरिकांनी दिली. यानंतर अग्निशमन दल व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या 11 फायर गाड्या पाठवण्यात आल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आग अद्याप देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली जात आहे. आग नेमकी कशी लागली ही समजू शकलेले नाही. यात सुदैवाने जिवीत हानी नसल्याचे सांगण्यात आले आहे.