Pune News : मुद्रांक जिल्हाधिकारी कोळेकर यांना मॅट कोर्टाचा दिलासा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  नोंदणी व मुद्रांक विभागातील मुद्रांक जिल्हाधिकारी गोपीनाथ कोळेकर यांना महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटीव्ह ट्रीब्युनल, मुंबई (मॅट) कोर्टाने दिलासा देवून नोंदणी व मुद्रांक विभागाला पुन्हा पुणे शहर मुद्रांक जिल्हाधिकारीपदी रुजू करण्याचे आदेश काढले आहेत.

२० सप्टेंबर २०२० रोजी नोंदणी व मुद्रांक विभागाने कोळेकर यांची ३ वर्षीचा कार्यकाळ पुर्ण होण्याअगोदरच नोंदणी महानिरिक्षक कार्यालयामध्ये तडकाफडकी बदली करून त्यांचे जागी अनिल पारखे यांची नेमणूक केली होती. कार्यकाळ पूर्ण न होताच बदली केल्याने कोळेकर यांनी मॅट कोर्टाकडे धाव घेवून दाद मागितली होती. कोळेकर यांचे वतीने ॲड. एस. डी. जोशी यांनी युक्तीवाद करून त्यांची बाजू मांडली.

कोळेकर यांनी त्यांचे कार्यकालामध्ये रिफंड फाईलचा तात्काळ निपटारा, पेंडीग प्रकरणांची तात्काळ सुनावणी, चुकवलेल्या मुद्रांक शुल्काची वसुली, आदी कामांना गती देवून नांदणी व मुद्रांक विभागामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यामुळे कोळेकर यांना पुन्हा पुणे शहर मुद्रांक जिल्हाधिकारीपदी रुजू करण्याचे आदेश झालेने नागरीक व वकील वर्गाकडून स्वागत केले जात आहे.