Pune News : पुरूषांनी स्त्री चा सन्मान करत स्त्रियांकडे पाहण्याची दृष्टी बदलावी – डॉ.नीलम गोऱ्हे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – (Pune) महाराष्ट्राची अस्मिता, क्षास्त्रतेज, देशाचे,राज्याचे रक्षण,स्वधर्माचे, रयतेचे रक्षण, त्याच बरोबर महाराष्ट्र एक लढाऊ राज्याची ओळख शिवाजी महाराजांनी दिली आणि त्यांच्यावर संस्कार करून स्वतःचे आयुष्यात त्याग करुन ईतिहास घडविण्याचे कार्य राजमाता जिजाऊ साहेबांनी केले.आजच्या या दिवशी महिलांनी स्वसंरक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे व पुरूषांनी स्त्री चा सन्मान करत स्त्रियांकडे पाहण्याची दृष्टी बदलली पाहिजे अशी भावना महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती ना.डॉ. गोऱ्हे नीलम (Dr. Neelam Gorhe ) यांनी व्यक्त केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त शिवसैनिकांच्या उपस्थितीत सिल्व्हर रॅाक्स” बंगला, हरेकृष्ण मंदीर पथ, मॅाडेल कॅालनी, शिवाजीनगर पुणे, डॉ.गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe ) यांच्या निवासस्थानी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शहर प्रमुख संजय मोरे, सविता मते, नगरसेविका संगीता ठोसर, कोथरूड विधानसभा समन्वयक सविता बलकवडे, कस्तुरी पाटील, शिरीष फडतरे, स्वाती धमाळे, अश्विनी शिंदे, अनिता परदेशी, तम्मा विटकर, युवराज शिंगाडे, शेलार गुरूजी, अनिता शिंदे, जयश्री सिरसाट, उपस्थित होते.

ना.डॉ. गोऱ्हे नीलम पुढे बोलताना म्हणाल्या, “महिला आणि समाजाच्या दृष्टीने स्वसंरक्षण महत्त्वाचे आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री, शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी विविध ठिकाणी स्वसंरक्षणासाठी महिलांना प्रशिक्षण सुरू केले आहे; त्यात आजतागायत दोन ते अडीच लाख महिला व मुलींन स्वसंरक्षणाचे धडे दिले आहे. तसेच शिवसेना महिला आघाडीच्या आक्रमकतेमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,गृहमंत्री अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून शक्ती विधेयक येत असल्याने यातून बर्याच महिलांना न्याय मिळेल.