Pune News : नदी पात्रातील मेट्रोचे पिलर्स हटवावे, पर्यावरणवादी संस्थेद्वारे मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  मुठा नदीत मेट्राे मार्गासाठी उभारण्यात आलेल्या पिलर्समुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील पुर पातळीत लक्षणीय वाढ झाल्याचा अहवाल ‘सीडब्ल्युपीआरएस’ या संस्थेने दिला आहे. पुराचा धाेका टाळण्यासाठी कीतीही खर्च आला तरी हे मेट्राेचे पिलर्स हटवावेत अशी मागणी पर्यावरणवादी सारंग यादवाडकर यांनी केली आहे.

मुठा नदीच्या निळ्या पुररेषेच्या आतुन मेट्राेचा सुमारे दिड किलाेमीटर लांबीचा मार्ग जात आहे. यासाठी पिलर्स उभारण्यात आले असुन, त्यामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण हाेऊन पुर पातळीत वाढ हाेणार आहे. त्याविरुद्ध राष्ट्रीय हरीत न्यायाधिकरणाकडे (एनजीटी ) अनु आगा, आरती किर्लाेस्कर, दिलीप पाडगांवकर, सारंग यादवाडकर यांनी याचिका दाखल केली हाेती. तेव्हा ऑक्टाेबर २०१७ मध्ये एनजीटीने नदीपात्रातील बांधकामांचा परीणामांचा अभ्यास करण्यासाठी समिती नियुक्त केली हाेती. या समितीने जानेवारी २०१८ मध्ये या मेट्राे पिलर्समुळेपुर पातळीत जास्तीत जास्त १२ मिलीमीटर वाढ हाेईल असा अहवाल सादर केला हाेता. त्याआधारे एनजीटीने नदीपात्रातील बांधकामाला हिरवा कंदील दाखविला हाेता.

या निर्णयाविरुद्ध सर्वाेच्च न्यायालयात दाद मागण्यात आली हाेती. सदर समितीने सादर केलेला अहवाल चुकीचा असुन, त्यामध्ये नदीची रुंदी २५ टक्के जास्त गृहीत धरली गेली हाेती. तसेच समितीने प्रत्यक्ष पुर पातळीत हाेणारी वाढ तपासण्याकरीता ‘सीडब्ल्युपीआरएस’ या संस्थेकडून करुन घेण्याची शिफारस केली हाेती. या समितीने सादर केलेल्या अहवालाची माहीती यादवाडकर यांनी पत्रकारांना दिली. या अहवालानुसार मेट्राे पिलर्समुळे शहराच्या मध्यवर्ती भागात पुराचा धाेका अधिक वाढल्याचे नमूद केले आहे.

* खडकवासला धरणातुन नदी प्रति सेकंद ६० हजार क्युसेक्स पाणी साेडल्यानंतर ते नदीपात्रात पसरते, त्यािठकाणी निळी रेषा आखली गेली आहे. तसेच १ लाख क्युसेक्स पाणी साेडल्यानंतर पाणी लाल रंगाच्या पुररेषेपर्यंत जाते.

* पिलर्समुळे शिंदे  पुलाजवळ ( बालगंधर्व पुल ) लाल रंगाच्या पुररेषेच्यावर एक लाख क्युसेक्स प्रवाहाची पातळी ०.७४ मीटरने वाढेल