Pune News : शिवाजीनगर ते लोणी काळभोरपर्यंत धावणार ‘मेट्रो’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला दिल्ली मेट्रोकडून एक अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये शिवाजीनगर न्यायालय ते लोणी काळभोरदरम्यानच्या 21 किमी लांबाची मेट्रो प्रकल्पाचा प्रारूप अहवाल आहे. हे 21 स्टेशन मार्गावर असणार आहेत. तसेच हा संपूर्ण मार्ग एलेव्हेटेड असून, त्याचा अंदाजे खर्च 7 हजार 200 कोटी अपेक्षित आहे.
शिवाजीनगरपासून ही मेट्रो हडपसर येथे नेण्याची मागणी केली जात होती. त्यामुळे हिंजवडी – शिवाजीनगर – हडपसर – फुरसुंगीपर्यंत असा मेट्रो मार्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच पीएमआरडीएने हिंजवडी ते शिवाजीनगर हा प्रकल्प हाती घेतला आहे. मात्र, शिवाजीनगर ते फुरसुंगी येथील गार्डनपर्यंत दर्शवण्यात आलेला मेट्रो मार्ग लोणीकाळभोरपर्यंत वाढवण्यात यावा, अशी सूचना पालकमंत्री अजित पवार यांनी केली होती.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट दरम्यान महामेट्रोकडून मेट्रो मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. या मार्गालाही आता पीएमआरडीएचा मेट्रो मार्ग जोडण्यात येणार आहे. त्यासाठी पुलगेट येथून स्वारगेट हा मार्ग दिल्ली मेट्रोने अहवालात प्रस्तावित केला आहे.