Pune News : मिलिंद एकबोटे यांना अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे : कोंढवा येथे महापालिकेतर्फे उभारण्यात येत असलेल्या धार्मिक स्थळाला विरोध करताना धार्मिक भावना दुखाविणे. तसेच जातीय दंगल भडकविण्याच्या उद्देशाने भाषण करून ती सोशल मिडियावर प्रसारित केल्याप्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यावर कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांना शुक्रवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. आगरवाल यांनी हा आदेश दिला. संभाजी बिग्रेड तर्फे या प्रकरणी फिर्याद देण्यात आली आहे. अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून एकबोटे यांच्यातर्फे अ‍ॅड. एस. के. जैन आणि अ‍ॅड. अमोल डांगे यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. एकबोटे यांच्यावर कोंढवा पोलिस ठाण्यामध्ये भा. द. वि. १५३, १५३(अ), १५३(ब), २९५ (अ), २९८, ५००, ५०१, ५०५, ५०२, ५०५ (२), १२० (ब), आय टी अ‍ॅक्ट ६६(अ), ६६(ब), नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी त्यांच्या विरुद्ध शाहाफाजील मोईनुदद्दीन सिन्दीकी आणि सतीश भास्कर काळे यांनी फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून एकबोटे यांनी अर्ज दाखल केला होता. या प्रकरणी एफआयआर उशीरा दाखल करण्यात आली आहे. अर्जदार यांनी फक्त लक्षात आणून दिले की, प्राथनास्थळाची बांधणी सिव्हिल आणि कल्चरल सेंटरच्या नावाखाली करण्यात येत आहे. संबंधित जागा पुणे महानगरपालिकेच्या ताब्यातील आहे. अर्जदार तपासक सहकार्य करण्यास तयार आहेत. त्यामुळे त्यांना पोलिस कोठडीतील चौकशीची गरज नाही. त्यामुळे या प्रकरणी अर्जदाराला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात यावा, असा युक्तिवात अ‍ॅड. एस. के. जैन आणि अ‍ॅड. अमोल डांगे यांनी केला. न्यायालयाने मिलिंद एकबोटे यांचा जामीन मंजूर करून पंधरा हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुसलक्यावर सोडण्याचा आदेश दिला. अर्जदाराने साक्षी पुराव्यात हस्तक्षेप कर नये, या अटीवर हा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.