Pune News : MIT डब्ल्यूपीयूच्या फार्मसी विभागातील प्राध्यापिका अश्‍विनी गावडे यांना PhD

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या फार्मसी विभागातील अश्‍विनी गावडे यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे येथील औषधनिर्माण शास्त्र (विज्ञान आणि तंत्रज्ञान) विभागातून पीएचडी प्रदान करण्यात आली.

अश्‍विनी गावडे यांनी मार्गदर्शक डॉ. संजय बोलधने यांच्या मार्गदर्शनाखाली ‘डेव्हलपमेंट ऑफ ओरल सॉलिड डोसेज फॉर्म बाय रिस्पॉन्स सरफेस मेथोडिओलॉजी’ या विषयावर शोधनिबंध सादर केला. त्यांच्या यशाबद्दल एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष राहुल विश्‍वनाथ कराड तसेच, स्कूल ऑफ फार्मसी विभागाचे अधिष्ठाता डॉ. भानुदास शंकरराव कुचेकर, इतर सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.