Pune News | राज ठाकरेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर, म्हणाले – ‘मी प्रबोधनकार ठाकरेही वाचलं आणि यशवंतराव चव्हाण देखील’

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune News | महाराष्ट्रमध्ये जातीपातीचे द्वेषमूलक राजकारण 1999 सालानंतर म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाले. या काळापासून इतर जातींबद्दल द्वेष निर्माण होण्यास सुरू झाली. मी प्रबोधनकार ठाकरे (prabodhankar thackeray) आणि यशवंतराव चव्हाण (yashwantrao chavan) दोघेही वाचलेले आहेत. माझ्या आजोबांच्या पुस्तकांचा या सर्व प्रकरणाची काय संबंध हे शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्पष्ट करावे असे राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले. माझ्यावर कडवट मराठी आणि कडवट हिंदुत्वाचे संस्कार झालेले आहेत असे सांगतानाच त्यांनी भविष्यातील राजकारणाची दिशा स्पष्ट केली.

महाराष्ट्रमध्ये 1999 सालापूर्वी जातीपाती होत्या. आपापल्या जातीचा प्रत्येकाला अभिमान होता.
परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीय द्वेष निर्माण होण्यास सुरुवात झाली.
शरद पवार आणि राष्ट्रवादी च्या लोकांनी फायद्यापुरते प्रबोधनकार सांगून उपयोग होणार नाही.
प्रबोधनकार तुम्हालाही परवडणारे नाहीत असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
पुढे ते म्हणाले, जाती-पातीतून बाहेर पडावे म्हणून माझा प्रयत्न आहे. मागील १५-२० वर्षात शाळा-कॉलेजमध्ये जाती आल्या. मैत्री सुद्धा जाती पाहून होऊ लागली.
अलीकडच्या काळात पत्रकारितेतही जातीयवाद आला आहे.
पत्रकारांनाही जातीचे लेबल चिकटू लागले आहे. ज्या महाराष्ट्राने देशाला विचार दिला.
त्या महाराष्ट्रात अगदी शेवटच्या घटकापर्यंत जातीचा मुद्दा आलेला आहे.

निवडणुकीसाठी हे सर्व मुद्दे वापरले जातात. मात्र त्याचे परिणाम भयानक होतील, अशी भीती राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
ऑलिम्पिक गोल्ड मेडल विजेता नीरज चोपडा हा जिंकण्यापूर्वी कोणालाही माहिती नव्हता.
मात्र जिंकल्यावर तो चोपडे झाला. त्याची जात माहिती पडली. मराठा मोर्चे-आंदोलने कसे निघाले याचा देखील अभ्यास होणे गरजेचे आहे.
जर मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसेल तर तसे त्यांना स्पष्ट सांगायला हवे.
उगाच तरुणांची माथी भडकावणे आणि तात्पुरता राजकीय फायदा मिळवणे याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागतील असे ते म्हणाले.

 

आज महाराष्ट्रात जातीचे वातावरण तयार केले जाते आहे. मतदानासाठी विविध पक्षांनी आपापल्या विविध जातीच्या आघाड्या काढल्या आहेत.
त्या समाजाच्या विकासासाठी आहेत की केवळ मतदानापुरत्या आहेत याचा विचार होणे गरजेचे आहेत.
मी बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडे इतिहास अभ्यासक म्हणून जातो. पवारांकडे राष्ट्रीय नेतृत्व म्हणून जातो.
ते केवळ मराठा आहेत आणि पुरंदरे ब्राह्मण आहेत म्हणून जात नाही.
मागील पन्नास वर्षात बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या इतिहासाबद्दल चुकीचे काही आहे असे पूर्वीच्या पिढ्यांना वाटले नाही.
मात्र हा विषय आत्ताच कसा कळला. स्वतः इतिहास वाचायचा नाही, अभ्यास करायचा नाही आणि माथी भडकवायची. विकृत इतिहास लिखाणासाठी एजंट नेमण्यात आलेले आहेत.
त्यांचे काम सुरू आहे. राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच जेम्स लेन कसा आला? हे सर्व डिझाईन आहे याचाही पुनरुच्चार त्यांनी केला.
आपल्याकडे आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रगती झाली आहे. मात्र आपण वैचारीक प्रगत केव्हा होणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

 

Web Title : Pune News | mns chief raj thackeray has replied ncp president sharad pawar that statement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Oily Spicy Food | चटपटीत आणि मसालेदार जेवणाची आवड असेल तर, जाणून घ्या जास्त तेल, मसाला खाण्याचे 10 दुष्परिणाम

Kolhapur Crime | अपत्य प्राप्तीसाठी नराधमाने डॉक्टर मित्राच्याच 7 वर्षाच्या मुलाचा दिला बळी! थरकाप उडवणारी घटना

Pune Crime | पतीचे जावेसोबत प्रेमसंबंध, पत्नीने उचलले टोकाचे पाऊल; पुण्याच्या विश्रांतवाडी येथील टिंगरेनगर परिसरातील घटना