Pune News : पुण्यातील फ्रेसेनियस काबी कंपनीत मनसेच ‘खळखट्याक’, व्हिडिओ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील फ्रेसेनियस काबी या कंपनीत आज मनसेने खळखट्याक करत तुफान राडा घातला. कंपनीने कामगार विरोधी धोरणामुळे तोडफोड केली असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले आहे.

रांजणगाव परिसरातील एमआयडीसीत ही कंपनी आहे. या कंपनीचे कार्यालय येरवडा परिसरात आहे. या कंपनीत काम करणारे काही कामगार हे मनसेचे सदस्य आहेत. कंपनी मात्र या कामगारांना काढून टाकणे, त्यांना धमकी देणे तसेच त्यांचे राजीनामे घेणे असे उद्योग करत होती. त्यामुळे आज मनसेचे कामगार सेना सरचिटणीस सचिन गोळे यांनी व काही कर्त्यांनी आज सकाळी कार्यालयात खळखट्याक केले. अचानक कार्यकर्ते तेथे गेले आणि तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता.

गोळे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पत्र व्यवहार करण्यात आला होता. पण त्याला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आज हे खळखट्याक प्रकरण घडले असल्याचे गोळे यांनी सांगितले आहे.