Pune News | मोदी जी “गेट वेल सून”; “GET WELL SOON”

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) केंद्रीय तपास यंत्रणेचा हुकूमशाही पद्धतीने वापर करून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा मा. सोनियाजी गांधी यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात आज सलग तिसऱ्या दिवशी पुन्हा बोलावले याच्या निषेधार्थे प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज बुधवार दि. 27 जुलै 2022 रोजी सकाळी १०.०० वा., डॉ. आंबेडकर पुतळा येथे “शांततापूर्ण सत्याग्रह” करण्यात आला त्यावेळी पुणे शहर प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी उपाध्यक्ष मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi), महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा बागवे, यांच्या सह इतर सर्व कॉंग्रेस पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. (Pune News)

 

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी उपाध्यक्ष मोहन जोशी ह्यांनी आंदोलनात निषेधात्मक भाषणात आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी आणि अमित शहा हे मानसिक रोगी आहेत, त्यांना विसरण्याचा आजार झाला आहे. त्यामुळे त्यांनी जे जे वचन जनतेला दिले होते त्याच्या बरोबर विरुद्ध करण्याचे काम ते करत आहेत. त्यांनी जनतेला 2014 पेक्षा महागाई कमी करण्याचे वचन दिले होते पण आजारी मोदी हे ते विसरले आणि त्यांनी महागाई कमी करण्याऐवजी महागाई वाढवली, त्यांनी सांगितले होते की, देशाची इज्जत वाढवेल त्या ऐवजी आजारी मोदी धडाधड सरकारी संपती विकत आहेत. आणि त्याच्या पुढे आत्ता त्यांना अजून एक रोग झाला आहे ते म्हणजे काही ही कारण नसताना गांधी घराण्यातील मंडळीना त्रास द्यायचा त्यालाच आधारून ईडी च्या माध्यमातुन राहुल गांधी आणि सोनिया गांधी ह्यांना त्रास देण्याचे कार्य सुरू आहे. (Pune News)

 

आजारी असलेले मोदी हे घृणा पूर्ण तिरस्कारपूर्ण राजकारण करत आहेत पण आम्ही तिरस्कार घृणा करणार नाही कारण आम्ही गांधी विचारांची मंडळी आहोत त्यानुसार आम्ही परमेश्वराला अशी प्रार्थना करतो हे परमेश्वरा ह्या आजारी मोदी ह्यांना बरे कर,
त्यांच्या मध्ये शिरलेला भस्मासुर राक्षस बाहेर काढ आणि त्यांना सद्बुद्धी दे….

 

त्यांच्या समोर फक्त देशातील 2 बिझनेस मन दिसत आहेत त्यांना 130 करोड जनता दिसत नाही त्यांना असे वाटते की
ते केवळ दोन उद्योजकांचे पंतप्रधान आहेत तरी परमेश्वरा त्यांना बुद्धी दे आणि स्मृती दे जेणेकरून त्यांना आठवेल की
पंतप्रधान म्हणुन त्यांचे कार्य 130 करोड जनतेसाठी आहे केवळ दोघांसाठी नाही.

मोदी जी गेट वेल सून
Modi जी GET WELL SOON…

 

 

Web Title : – Pune News | Modi ji Get Well Soon

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा