Pune News : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना पितृशोक

पुणे : राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे dattatraya bharne) यांचे वडिल विठोबा (तात्या) राम भरणे (वय ८५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल येथे उपचार करण्यात येत होते. मंगळवारी रात्री त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागे ४ मुले, ३ मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी या मुळ गावी त्यांच्यावर बुधवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.