Pune News | पुण्यामध्ये सर्वाधिक हिंजवडी, वाकड, म्हाळुंगे, ताथवडे, बाणेर, सूस, बालेवाडी या परिसरात गृह खरेदी; शहरात 8 टक्क्यांनी घरांच्या खरेदीमध्ये वाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | सर्वाधिक घर खरेदीसाठी लोक मुंबई आणि पुणे शहराला (Pune News) पंसती देतात. मात्र या दोन्ही शहरातील गृह खरेदी दरात वाढ केली जाते. अशातच पुणे महानगर क्षेत्रात (Pune metropolitan area) जानेवारी 2021 ते जुलै 2021 या महिन्यातील कालावधीत जवळपास 53 हजार घरांची विक्री झाली आहे. त्या महिन्याच्या तुलनेत साधारण 8 टक्क्यांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर, 2019 साली 49 हजार घरांची विक्री झाली होती. तसेच, मागील 2 वर्षानंतर आता प्रथम 6 महिन्यात विक्रीच्या दरात जवळपास 27 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

घराच्या खरेदीत इतकी वाढ होण्याचं नेमकं कारण काय असेल असा प्रश्न उभा रहात असेल, तर त्याचं कारण म्हणजे आकाराने मोठ्या असलेल्या घरांच्या खरेदीमुळे विक्री मूल्यात वाढ झालीय. त्यामुळे गृह खरेदीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशी माहिती ‘सीआरई मॅट्रिक्स’ (CRE Matrix) ने तयार केलेल्या ‘पुणे हाउसिंग रिपोर्ट’मध्ये दिली आहे. तर, क्रेडाई पुणे मेट्रोच्या 38 व्या सर्वसाधारण सभेत या अहवालाचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दिक्षीत (Dr. Brijesh Dixit), संचालक अतुल गाडगीळ (Atul Gadgil) , क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष अनिल फरांदेसह (Anil Farande) अन्य पदाधिकारी, सचिव उपस्थित होते.

पुणे महानगर क्षेत्रातील (Pune metropolitan area) बांधकाम क्षेत्राचा विचार करता जानेवारी ते जुलै (2019-2021) कालावधीत विक्री झालेल्या घरांची संख्या, आकार आणि त्यांचा दर अहवालातील आराखडे बांधले आहेत. दरम्यान, क्रेडाई पुणे मेट्रो (Credai Pune Metro) अध्यक्ष अनिल फरांदे (Anil Farande) म्हणाले की, रिपोर्टमध्ये आयजीआर महाराष्ट्राच्यावतीने देण्यात आलेल्या आकडेवारीचा समावेश केल्याने यामधून आश्चर्य वाटावे असे निष्कर्ष समोर आलेत. त्यात नमूद 2019 आणि 2021 चे आराखडे हे आशावादी आहेत. वैज्ञानिक विश्लेषणाद्वारे तयार केलेल्या या अहवालाचा उपयोग पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांना भविष्यात यशस्वी प्रकल्प (Pune News) उभारणीसाठी निश्चित होईल. असं ते म्हणाले.

 

सर्वाधिक ‘या’ भागात गृहखरेदीला पंसती –

– हिंजवडी (Hinjawadi )
– वाकड (Wakad)
– महाळुंगे (Mahalunge)
– ताथवडे (Tathawade)
– बाणेर (Baner)
– सूस (Sus)
– बालेवाडी (Balewadi )

दरम्यान, जानेवारी ते जुलै 2021 साली शहरातीव वरील सात भागात तब्बल 7 हजार 160 कोटी रुपये किमतीच्या घरांची विक्री झाली आहे. या दरम्यान, शहराचा विचार केल्यास एकूण विक्रीच्या 26 टक्के विक्री ही केवळ याच भागामधील झाल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे. तसेच यांनतर पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) भागात साधारण 23.5 टक्के विक्री झाल्याचे समोर आले.

Web Titel :- Pune News | Most of the houses in Hinjewadi, Wakad, Mahalunge, Tathawade, Baner, Sus, Balewadi in Pune; 8 percent increase in home purchases in the city

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Javed Akhtar | जावेद अख्तर यांनी खंडणी मागितली, कंगना रनौतचा आरोप; म्हणाली – ‘कोर्टावरील विश्वास उडाला’

PMC GB Meeting | पुणे मनपात निधीसाठी विरोधकांकडून गाणी गाऊन ‘आयुक्तांकडे’ विनवणी; तर सत्ताधाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

PMC General Meeting | पुणे मनपा सर्वसाधारण सभा : निधीसाठी विरोधकांकडून गाणी गाऊन ‘आयुक्तांकडे’ विनवणी तर सत्ताधाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा