Pune News | पुण्यातील बाणेर, वाकड, हिंजवडीत सर्वाधिक पसंती; जाणून घ्या कारण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune News | ‘क्रेडाई पुणे मेट्रो’ने (credai pune metro) सीआरई मॅट्रिक्स (cre matrix) यांच्या वतीने तयार केलेल्या ‘पुणे हाउसिंग रिपोर्ट’च्या (pune housing report) माध्यमातून पुण्यात घर खरेदीसाठी कोणत्या भागाला सर्वाधिक पसंती देण्यात येत आहे याची माहिती समोर आली आहे. पुणे शहराच्या वायव्य दिशेला ग्राहकांची पसंती वाढत आहे. कारण या भागात चांगल्या पायाभूत सुविधा, मुंबई-बंगळूर एक्स्‍पेस-वे (mumbai bangalore expressway) आणि आयटी क्षेत्र (IT it Industries) वाढू लागले आहे. त्यामुळे वाकड (Wakad), महाळुंगे (Mahalunge), ताथवडे (Tathawade), बाणेर (Baner), सूस (Sus), रावेत (Ravet), किवळे (Kiwale), पुनावळे (Punawale), हिंजवडी (Hinjewadi), बालेवाडी (Balewadi)या भागात शहराच्या एकूण घर विक्रीच्या तुलनेत सर्वाधिक घर विक्री झाली आहे. त्यातून जानेवारी ते जुलै दरम्यान या भागात घरांचे विक्रीचे ७ हजार १६० कोटींचे व्यवहार झाले आहेत. (Pune News | Most preferred in Baner, Wakad, Hinjawadi in Pune; Know the reason)

क्रेडाई पुणे मेट्रो अध्यक्ष अनिल फरांदे (Credai Pune Metro President Anil Farande) म्हणाले की,
शहराच्या वायव्य दिशेला हिंजवडी आयटी पार्क (hinjewadi it park),
चांगले वातावरण यासह चांगल्या रहिवासास आवश्‍यक असलेल्या अनेक बाबी आहेत.
त्यामुळे आताच नव्हे तर भविष्यातही या भागातील घरांना चांगली मागणी असेल.
पिंपरी-चिंचवड (PImpri-Chinchwad) शहराचे देखील आम्ही अशाच प्रकारे विश्लेषण करणार आहोत.
नागरिकांची पिंपरीच्या पश्‍चिम भागाला चांगली पसंती असल्याचे त्यांनी सांगितले.

 

जानेवारी ते जुलै २०२१ मधील घरांची विक्री

वायव्य भाग

पुण्याचा वायव्य भाग (Pune) म्हणजे हिंजवडी, वाकड, महाळुंगे, ताथवडे, बाणेर, सूस, बालेवाडी, रावेत, किवळे, पुनावळे या ठिकाणी ७ हजार १६० कोटी रुपये किमतीच्या घरांची विक्री झाली.
शहरातील एकूण विक्रीच्या २६ टक्के विक्री ही एकट्या याच भागात झाली असून त्याखालोखाल पिंपरी चिंचवड भागात २३.५ टक्के विक्री झाली आहे.

नैर्ऋत्य भाग

पुण्याच्या नैर्ऋत्यकडे असणाऱ्या धायरी, कोथरूड, आंबेगाव बुद्रुक, वारजे, हिंगणे, शिवणे, वडगाव हा भाग वगळता पुण्याच्या सर्वच मायक्रो मार्केट्समध्ये घरांची विक्री वाढली आहे.
भागात चार हजार १३६ कोटी रुपयांच्या घरांची विक्री झाली. २०२० मध्ये हा आकडा एक हजार ५९३ कोटी रुपये होता.

ईशान्य भाग

ईशान्य कडे असणाऱ्या वाघोली, मुंढवा, हडपसर, खराडी, धानोरी, लोहगाव भागात पाच हजार १७४ कोटी रुपयांच्या घरांची विक्री २०२० मध्ये हा आकडा दोन हजार १५१ कोटी रुपये होता.
तर २०१९ मध्ये ५ हजार ३०१ कोटी रुपये किमतींच्या घरांची विक्री झाली होती.

 

आग्नेय भाग

आग्नेय कडील उंड्री, कोंढवा, महम्मदवाडी, फुरसुंगी, कोंढवा बुद्रूक, येवलेवाडी येथेही घरांची विक्री वाढली आहे.
या भागात ३ हजार ७३८ कोटी रुपयांच्या घरांची विक्री झाली असून २०२० मध्ये हा आकडा एक हजार ५५९ कोटी तर २०१९ मध्ये ३ हजार ६९ कोटी इतका होता.

मध्य पुणे

२०१९ मध्ये मध्य पुण्यात ७२३ कोटी रुपयांच्या घरांची विक्री झाली असून २०२० मध्ये हा आकडा ४७४ कोटी रुपये, तर २०२१ मध्ये ९०२ कोटी रुपये झाला आहे.

पिंपरी भागात २०१९ मध्ये पाच हजार २१८ कोटी रुपये, २०२० मध्ये दोन हजार ८६१ कोटी रुपये तर २०२१ मध्ये सहा हजार ४४७ कोटी रुपये इतक्या किमतीच्या घरांची विक्री झाली आहे.

 

Web Title : Pune News | Most preferred in Baner, Wakad, Hinjawadi in Pune; Know the reason

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Thane News | द्यायची होती कोविड-19 व्हॅक्सीन पण दिली रॅबीजची लस, नर्सला करण्यात आले निलंबित

Surgical Strike | ती रात्र…जेव्हा लष्कराने PAK मध्ये 3 किलोमीटर आत घुसून उडवली दहशतवाद्यांची ठिकाणे, 4 तासात केला होता 38 दहशतवाद्यांचा ‘खात्मा’

Police Raid | खंडणी वसुलीसाठी पोलिसांची छापेमारी ! 3 तरुणांना बेदम मारहाण एकाचा मृत्यू; 6 पोलीस निलंबित