Pune News | MPSC परीक्षा पास होऊनही नोकरी नसल्याच्या तणावातून आत्महत्या; डोळ्यात पाणी आणणारी स्वप्नील लोणकरची सुसाईड नोट ‘व्हायरल’

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पुण्यात (Pune) स्पर्धा परीक्षा (MPSC) देणाऱ्या अवघ्या 24 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याने राज्यभरात खळबळ उडाली असताना आता त्यानं आत्महत्या (Suicide) करण्यापूर्वी लिहिलेली सुसाईड नोट (Suicide note) आजच्या ‘स्पर्धा परीक्षा'(MPSC) देणाऱ्या तरुणांची कहाणी आणि मनामधील घालमेल समोर आली आहे. तो म्हणतोय, ‘MPSC मायाजाल यात पडू नका’ असे म्हणत त्यानं लिहिलं ‘घेतलेल कर्ज, खासगी नोकरी करून कधीही न फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर. घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढणाऱ्या अपेक्षा आणि मी प्रत्येक वेळी कमी पडतोय ही भावना.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

स्वप्नील सुनील लोणकर (Swapnil Sunil Lonkar) असे आत्महत्या केलेल्या या तरुण विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.  स्वप्नीलनं स्थापत्य अभियांत्रिकीच शिक्षण घेतले होते. त्याच्या वडिलांचा शनिवार पेठेत बिल बुक बनवण्याचा प्रिटींग प्रेस व्यवसाय आहे. त्यानं घरी आई वडील नसताना त्यानं त्याच्या खोलीत गळफास घेतला. त्याच्याकडे कुटुंबाला ही सुसाईड नोट मिळाली आहे.

स्वप्नील ची सुसाईड नोट बरच काही सांगून जात आहे. लाखो विद्यार्थी आज स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत. अनेकवर्षं प्रयत्न करतात. पण, अपयश आल्यास ते कसं पचवायच हे मात्र आज कोणी तरी सांगणं गरजेचे आहे, असे आता जानकर आणि काही तरुण बोलू लागले आहेत.

File photo

स्वप्नीलनं लिहिलेली सुसाईड नोट…

“MPSC मायाजाल यात पडू नका”

Mpsc मेन्स 2019

Add – 2019

जूनला प्री क्रॅक केली

नोव्हेंबरला मेन्स क्रॅक केली

दिड वर्षांपासून मुलाखत पेंडीग…

Mpsc 2020

Add – मार्च 2020

प्री – मार्च क्लिअर

मेन्स – पेंडीग

” येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत फक्त वय आणि ओझं वाढत जात. Confidense तळाला पोहचतो आणि self doubt वाढत जातो.

दोन वर्षे झालेत पास होऊन आणि वय 24 संपत आलं आहे. घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेलं कर्ज खासगी नोकरी करुन कधीही न फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि मी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना.

कोरोना नसता तर सर्व परीक्षा सुरळीत झाल्या असत्या. आज आयुष्य खूप वेगळं आणि चांगलं असत. “मी घाबरलो, कमी खचलो असं मुळीच नाही. मी फक्त कमी पडलोय, माझ्याकडे वेळ नव्हता.

नकारात्मकतेचं वादळ ही कित्येक दिवस मनात होतं. पण काही तरी चांगलं होईल या आशेवर तग धरला होता. पण आता इथून पुढे आयुष्य कन्टीन्यू होऊ शकेल अस काही उरलेलं नाही. याला कोणतीही व्यक्ती कारणीभूत नसून हा माझा सर्वस्वी निर्णय आहे.

मला माफ करा… 100 जीव वाचवायचे होते. पण डोनेशन करून 72 राहिले. जमलं तर इतरांपर्यंत पोहचवा. अनेक जीव वाचतील.
स्वप्नील लोणकर. 

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : pune news | mpsc pass student swapnil lonakar commits suicide hanging himself he could not get-job, suicide note becomes viral on social media

हे देखील वाचा

Pune Crime News | अनैतिक संबंधास अडसर ठरणार्‍यास ‘ढोंगी बुवा’ अन् महिलेनं संपवलं; पुण्याच्या कात्रज घाटात फेकला मृतदेह

Pune News | ठाकरे सरकारसाठी नामुष्की ! MPSC परीक्षा पास होऊनही नोकरी नाही, तणावातून स्वप्नील लोणकरची आत्महत्या; जाणून घ्या

20 Rupees Note | जर तुमच्याकडे आहे Rs 20 ची Note तर घरबसल्या कमावू शकता हजारो, जाणून घ्या पद्धत