Pune News | ठाकरे सरकारसाठी नामुष्की ! MPSC परीक्षा पास होऊनही नोकरी नाही, तणावातून स्वप्नील लोणकरची आत्महत्या; जाणून घ्या

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (MPSC Exam) उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी (JOB) मिळाला नसल्याने तणावातुन व आर्थिक परिस्थितीमुळे एका विद्यार्थ्याने (Student) गळफास घेऊन आत्महत्या (committed suicide) केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरात (Pune City) घडली आहे. ही घटना पुणे शहरातील (Pune City) फुरसुंगी (Fursungi) येथील गंगानगर मध्ये 29 जून रोजी घडली आहे. स्वप्नील सुनील लोणकर Swapnil Sunil Lonakar (वय-24 रा. गंगानगर, फुरसुंगी) असे आत्महत्या करणाऱ्या विद्याथ्याचे नाव आहे. स्वप्निलच्या आत्महत्येमुळे ठाकरे सरकारसाठी (Thackeray government) नामुष्की ठरणार आहे. (Passing MPSC Exam Student Committed Suicide Job)

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update 

स्वप्नील स्थापत्य अभियांत्रिकीचा पदवीधर
मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील लोणकर (Swapnil Sunil Lonakar) यांचे वडील सुनील लोणकर यांचा शनिवार पेठेमध्ये (Shaniwar Peth) बिल बुक (Bill Book) बनवण्याचा लहान प्रिटींग प्रेसचा (Printing press) व्यवसाय आहे.
याठिकाणी ते आणि स्वप्नीलची आई दोघेजण काम करतात.
तर स्वप्नील याने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त (Degree in Civil Engineering) केली आहे.
स्वप्नीलचे आई-वडील नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी कामानिमित्त बाहेर पडले.
त्यानंतर दुपारी साडे चारच्या सुमारास घरी आले.
तेव्हा, स्वप्नीलने त्याच्या खोलीमध्ये गळफास (committed suicide) घेतल्याचे निदर्शनास आले.
आईने या घटनेची माहिती वडिलांना दिली. त्यानंतर स्वप्निलला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषीत केले.

तणावातून स्वप्नीलची आत्महत्या
कोरोना महामारीमुळे (Corona epidemic) राज्य लोकसेवा आयोगाची (State Public Service Commission) परीक्षा अनेकवेळा पुढे ढकलावी लागली आहे. त्यातून स्पर्धा परीक्षा अभ्यास तरुणांमध्ये तणाव वाढत आहे. एकीकडे परीक्षा होत नाहीत तर दुसरीकडे खर्च कायम आहे. यामुळे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी दुहेरी कात्रीत सापडले आहेत. पूर्व आणि मुख्य परीक्षा (Pre and main exam) उत्तीर्ण होऊन केवळ मुलाखत (Interview) न झाल्याने नोकरी मिळू शकली नाही. याच तणावातून स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केली.

Web Title : Pune News mpsc pass student swapnil lonakar commits suicide hanging himself he could not get job

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update 

हे देखील वाचा

7th Pay Commission । केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी ! बँक अकाऊंटमध्ये जमा होणार 2,18,000 रूपये; जाणून घ्या कसे

New Liquor Licence | मुंबईसह राज्याच्या मद्य नियमावलीत सुधारणा होण्याची शक्यता

Builder Avinash Bhosale | प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंच्या मुलाची ईडीकडून चौकशी