Pune News | ब्लॅक फंगसवरील उपचाराचा खर्च कमी करण्यासाठी पर्याय

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्गानंतर म्युकरमायकोसिस (black fungus) जीवघेणा आजार ठरत आहे. अनेक राज्यांनी या ब्लॅक फंगस म्हणजेच काळ्या बुरशीच्या संसर्गालाही साथीचा रोग म्हणून जाहीर केले आहे. कोरोना उपचारानंतर अनेकांना ब्लॅक फंगस (black fungus)चा सामना करावा लागत आहे. या आजाराची रुग्णसंख्या देशात वाढत आहे. मात्र याचे उपचारही कोरोनासारखेच महागडे अन् औषध टंचाईचे आहेत. त्यामुळे पुण्यातील डॉक्टरांनी ब्लॅक फंगसवरील उपचार पद्धतीचा कमी खर्चाचा पर्याय सांगितला आहे.

कोरोनातून बरे झालेल्या काही लोकांना ब्लॅक फंगसची लागण होत आहे. अशा रुग्णांचा एका दिवसाचा खर्च हा जवळपास 35 हजार रुपये आहे. तो 100 पटींनी कमी करून फक्त 350 रुपयांवर आणता येऊ शकते. यावर पुण्यातील डॉक्टरांनी पर्याय सांगितला आहे. यात सावधानतेने रुग्णाच्या रक्तातील क्रिएटिनिन लेव्हलवर लक्ष ठेवावे लागेल. यामुळे उपचाराचा खर्च कमी होईल. ब्लॅक फंगसच्या उपचारासाठी लागणा-या एम्फोटेरेसिन इंजेक्शनचा तुटवडा असून त्याची किंमत देखील जास्त आहे. यामुळे दुसरी उपचारपध्दती वापरून यावरील खर्च कमी करता येईल. याकरिता दुसऱ्या दिवशी रुग्णाची रक्त चाचणी करावी लागेल.

पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजचे ENT प्रमुख समीर जोशी म्हणाले की, कोरोनानंतर ब्लॅक फंगसच्या 201 रुग्णांवर उपचार केले आहेत. यापैकी 85 टक्के रुग्ण हे conventional amphotericin आणि सर्जरी केल्यानंतर बरे झाले आहेत. कोरोनाच्या आधी याच पद्धतीने ब्लॅक फंगसचे 65 पैकी 63 रुग्ण बरे झाले आहेत. सर्जरीमध्ये मृत पेशी काढून टाकल्या जातात. तर दुसरे ENT सर्जन संदीप कर्माकर यांनी सांगितले की, conventional आणि Liposomal amphotericin उपलब्ध होत नाहीत. conventional चा खर्च देखील कमी आहे.

हे देखील वाचा

‘पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर तुमची लायकी काय झाली असती’, ….

CM उद्धव ठाकरे घेणार मंगळवारी पंतप्रधान मोदींची भेट; …

PM नरेंद्र मोदी आज संध्याकाळी देशाला संबोधित करणार

पाण्याच्या टाकीतील मृतदेह गुढ उकलले ! चार दिवसांनंतर पत्नीने दिली कबुली; म्हणाली – ‘हा, मैने किया मर्डर

तसेच फेसबुक पेज ला लाईक करा

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

Web Title : pune news mucormycosis black fungus care will be 100 times cheaper pune doctors find way