Pune News | महापालिकेचा मोर्चा ‘पाणीपट्टी’ थकबाकी वसुलीकडे; ऑक्टोबर अखेरपर्यंत विशेष मोहिमेचे आयोजन – रुबल अग्रवाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून आता थकित ‘पाणीपट्टी’ वसुलीकडे मोर्चा वळविला आहे. शहरातील व्यावसायिक मीटरद्वार पाणी घेणार्‍या थकबाकीदारांकडे सुमारे १७० कोटी रुपयांची थकबाकी असून ऑक्टोबर अखेरपर्यंत अधिक थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल (Rubel Agarwal) यांनी दिली.

शहरात ३५ हजार मिळकतींना मिटरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. यातील बहुतांश मिळकती या व्यावसायीक वापरांच्या आहेत. या मिळकतधारकांकडे सुमारे १७० कोटी रुपये थकबाकी आहे. प्रामुख्याने नादुरूस्त मिटर, मिळकतींची मालकी बदलल्याने निर्माण होणार्‍या तांत्रिक अडचणी, दुबार बिले, चुकीची बिले तसेच सरकारी कार्यालयांना होणार्‍या पाणी पुरवठ्याची सर्वाधिक थकबाकी आहे. यापैकी काहीजण न्यायालयात गेले असून काही प्रकरणे लोक अदालतीमध्ये तडजोडीने सोडविण्यात आली आहेत. तर ७०० हून अधिक असे मोठे थकबाकीदार आहेत की त्यांच्याकडून वसुलीसाठी कुठलिही अडचण नाही. पहिल्या टप्प्यात त्यांच्याकडून थकबाकी वसुलि करण्यात येईल.

यासोबतच ज्यांचे मिटर नादुरूस्त आहेत, त्याठिकाणी महापालिकेच्यावतीने मीटर लावून दोन महिन्यातील पाणी वापरानुसार सरासरी थकबाकीची रक्कम ठरविण्यात येणार आहे. लोक अदालतीमध्ये तडजोड केल्यानंतरही थकबाकी न भरणार्‍यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल. येत्या ३० ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम जोरदारपणे राबवून अधिकाअधिक थकबाकी वसुली करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे रुबल अग्रवाल Rubel Agarwal यांनी नमूद केले.

Also Read This : 

खासदार नवनीत राणांची CM ठाकरेंवर जळजळीत टीका, म्हणाल्या – ‘तुम्ही लायक असता तर दिल्लीत येण्याची गरजच नव्हती’

फाटलेल्या टाचा काही दिवसातच होतील ‘मुलायम’, वापरा हे DIY Foot Mask

कामाची गोष्ट ! App बनावट आहे कि Fake? डाउनलोड करण्यापूर्वी ‘हे’ लक्षात ठेवा, अन्यथा…

त्वचा-आरोग्य आणि प्रतिकारशक्तीसाठी रामबाण उपाय आहे टोमॅटोचा रस; ‘या’ पध्दतीनं बनवा, मिळतील ‘हे’ फायदे, जाणून घ्या

राज्यात 28 मेपर्यंत 5126 लोकांना म्युकरमायकोसिसची लागण

 

Wab Title : Pune News | Municipal Corporation’s ‘Panipatti’ arrears recovery; Organizing a special campaign till the end of October – Rubel Agarwal