Pune News : हडपसर परिसरात एकाचा राहत्या घरात खून, 7 दिवसानंतर वाचा फुटली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुण्यातील हडपसर परिसरात एकाचा राहत्या घरात खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. 7 दिवसानंतर या खुनाला वाचा फुटली आहे. हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

ग्रेगरी जॉन कार्डोस (वय 42) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पत्नी शहनाज कार्डोस/खान यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेगरी हे इलेक्ट्रिकची कामे करत होते. त्यांचे व पत्नीचे वाद होते. त्यामुळे पत्नी राहत नव्हती. ती अधून मधून येत असत. लॉकडाऊनमुळे ग्रेगरी देखील घरीच राहत असत. दरम्यान आज पहाटेच्या वेळी घरातून वास येत असल्याने पाहिले असता मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाहणी केल्यानंतर अज्ञाताने त्याचा खून केला असावा असा संशय आला. त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, तो खून नसावा अशी शक्यता हडपसर पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ग्रेगरी यांना दारूचे व्यसन होते. तर त्यांना आजार देखील होता. डॉक्टरांच्या अहवालानंतर मृत्यूचे कारण समजू शकेल असे सांगण्यात आले आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक मनोज पाटील हे करत आहेत.