Pune News | पुण्यात 17 वर्षीय मुलाचा 8 ते 10 जणांच्या टोळक्याकडून कोयत्याने सपासप वार करून खून, परिसरात प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दत्तवाडी भागात एका अल्पवयीन मुलाचा 8 ते 10 जणांच्या टोळक्याने कोयत्याने सपासप वारकरून खून Murder केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून या घटनेने पुन्हा एकदा दत्तवाडी परिसर हादरून गेला आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

सौरभ तानाजी वाघमारे Saurabh Tanaji Waghmare (वय 17) असे खून Murder झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा Crime दाखल करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. दरम्यान, आज (रविवार) रात्री 9 नंतर पर्वती पायथा परिसरात आठ ते दहा जणांच्या टोळक्याने सौरभ याला गाठले. त्यानंतर त्याच्यावर सपासप वारकरून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. यानंतर हे टोळके घटनास्थळावरून पसार झाले. खुनाची घटना कळताच दत्तवाडी पोलिसांनी धाव घेतली. हा खून नेमका का झाला हे समजू शकलेले नाही. मात्र पूर्वीचे वाद आणि गुन्हेगारीतील खुन्नस यावरून खून झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दत्तवाडी परिसरात अल्पवयीन मुलाच्या खुनाने हादरून गेला आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : Pune news murder of 17 years old youth

हे देखील वाचा

‘या’ 5 वस्तूंच्या अति सेवनाने कमजोर होते इम्यून सिस्टम, बाळगा सावधगिरी

पुणे शहर काँग्रेस तर्फे छत्री मोफत दुरुस्ती उपक्रम

Pune Crime News | लग्नाची वरात पहात असलेल्या तरुणावर सुरीने वार, पूर्ववैमनस्यातून जीवे मारण्याचा प्रयत्न

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा