Pune News : ‘नक्षत्र’ परिवारातर्फे विविध क्षेत्रातील 9 कोरोना योद्धा महिलांचा सन्मान ! कोरोनाच्या काळात महिलांनी केलेले कार्य हे प्रेरणादायी : डॉ. नीलमताई गोऱ्हे

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनाच्या काळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुण्यातील विविध क्षेत्रातील ९ कोरोना योद्धा महिलांचा सन्मान नुकताच करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या कार्यक्रमाला विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलीमाताई गोऱ्हे, (Dr. nilam gorhe ) मा. आमदार मेधाताई कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय उद्योजका व राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित नीलिमा तपस्वी, देशमुख महाराज फाउंडेशनच्या विश्वस्थ सुवर्णा बालीघाटे, नक्षत्र परिवाराच्या संचालिका अप्रिता तुम्मा असे विविध क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते. कोरोनाच्या काळातील कामगिरीबद्दल डॉ. संगीता भारती, आशा वाघ, उमा विश्वनाथन, अॅड. वैशाली चांदणे, संजीवनी हिंगणे, सुनीताराजे निंबाळकर, अनिता झांबरे, डॉ. नेहा बेलसरे, डॉ. भूतकर या विविध क्षेत्रातील ९ महिलांना नऊवारी साडी, श्रीफळ, शेला, सन्मानचिन देवून सन्मान करण्यात आला. डॉ. नीलमताई गोऱ्हे (Dr. nilam gorhe ) या प्रसंगी म्हणाल्या कि कोरोनाच्या काळात महिलांनी केलेले कार्य हे प्रेरणादायी असून या महिलांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपले जीवन जेवढे अनमोल तेवढेच दुसऱ्याचे अनमोल, हा मनात विचार रुजवून कोरोनाच्या काळात महिलांनी केलेले सामाजिक कार्य हे प्रशंसनीय आहे.डॉ. नीलिमाताई पुढे म्हणाल्या कि महिलांनी संवाद कौशल्य जेवढी चांगली तेवढी जीवनात प्रगती मोठ्या प्रमाणात होत असते. म्हणून महिलांनी संवाद कौशल्य वाढीवले पाहिजे. डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी कार्यक्रमात ऑनलाईनद्वारे माहिलांशी संवाद साधला.

यावेळी नीलिमा तपस्वी आंतराष्ट्रीय महिला उद्योग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या म्हणाल्या कि महिलांनी उद्योग क्षेत्रात याला हवे, समाजाची बंधने झुगारून महिला जेव्हा स्वतःच्या पायावरती उभी राहील तेव्हा समाजाबरोबर देश हि घडेल. प्रत्येक घरात. जिजामाता, सावित्रीबाई, राणी लक्ष्मी राणी चेल्ल्मा, रणरागिणी ताराराणी घडायला हव्यात. तर मा.आमदार मेधाताई कुलकर्णी म्हणाल्या कि फक्त महिलादिनी, नवरात्रीच्या दिवशी महिलांची आठवण काढली जाते. मात्र संपूर्ण वर्ष महिलांचा सन्मान होणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान होतो त्या ठिकाणी सरस्वती, दुर्गा, लक्ष्मी स्वतः येवून वास्तव करतात. नक्षत्र परिवाराने आज विविध क्षेत्रातील महिलांचा केलेला सन्मान हा स्त्री वर्गाला प्रेरणा देणारा आहे.

या कार्यक्रमाला गणेश तुम्मा, अर्पिता तुम्मा, संजय देशमुख, विशाल बत्तुल, प्रकाश वाकुडे, प्रशांत वग्गु, यश येमूल असे मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीप्ती हलवाई यांनी केले तर आभार गणेश तुम्मा व उमा विश्वनाथन यांनी मानले.