Pune News : नीरा पोलिसांनी वाहनचालकांकडून केला 24 हजार रूपये दंड वसूल

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन – सद्या पुणे जिल्हा ग्रामिण पोलिस हद्दीत विनामास्क फिरणाऱ्या वाहनचालकांवर शासनाच्या आदेशानुसार दंडात्मक कारवाई सुरू आहे. त्या पार्श्वभुमीवर नीरा पोलिसांनी शनिवारी (दि.१३) दुचाकीवर व चारचाकी वाहनात विनामास्क फिरणाऱ्या तसेेेच ट्रिपल सीट व ड्रायव्हिंग लायसेन्स नसणाऱ्या वाहनचालकांवर धडक दंडात्मक कारवाई करीत २४ हजार ४०० रूपये दंड वसूल केला.

पुुुणेे शहराबरोबर जिल्ह्याच्या ग्रामिण भागातही पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. पुरंदर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पुरंदरमधील सासवड, दिवे, आंबोडी व नीरा ही गावे कोरोना हॉटस्पॉट ठरलेली आहेत. त्यामुळे प्रशासन कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना करीत आहे. परंतू बहुतांश नागरिक दुचाकीवर व चारचाकी वाहनांत विनामास्क फिरताना दिसत आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार नीरा पोलिस विनामास्क फिरणा-या , ट्रिपल सिट व ड्रायव्हिंग लायसेन्स नसणा-या वाहनचालकांवर धडक दंडात्मक कारवाई करीत आहे. शनिवारी (दि.१३) दुपारी चार वाजेपर्यंत ३७ जणांवर दंडात्मक कारवाई करून १८ हजार ५०० व ऑनलाईन द्वारे ११ जणांवर कारवाई करीत ५ हजार ९०० असे २४ हजार ४०० रूपये दंड वसूल केला असल्याचे फौजदार कैलास गोतपागर यांनी सांगितले

नीरेत विनामास्क फिरणा-यांवर पुणे ग्रामिण पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख , अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांच्या सुचनेनुसार जेजुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनिल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली नीरा पोलिस दुरक्षेञाचे फौजदार कैलास गोतपागर, सहा.पोलिस फौजदार सुदर्शन होळकर, सुरेश गायकवाड, पोलीस हवालदार नवनाथ पिंगळे, पोलिस कॉन्स्टेबल निलेश जाधव, पोलिस पाटील राजेंद्र भास्कर, होमगार्ड, पोलिस मिञ रामचंद्र कर्नवर यांनी कारवाईत
सहभाग घेतला.

नीरा परिसरातील नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे – फौजदार गोतपागर
नीरा गावात परिसरातून येणारे बहुतांश नागरिक विनामास्क फिरणे, सोशल डिस्टंसिंग या सारखे कोरोना नियमांचे पालन करीत नसल्याचे आढळत आहे. अशा नागरिकांनी कोराना नियमांचे पालन करावे असे आवाहन नीरा पोलिस दुरक्षेञाचे फौजदार कैलास गोतपागर यांनी केले आहे.