Pune News : महापालिकेला 60 हजार लसीचे डोस प्राप्त, लसीकरणाच्या परिणामाचा अहवाल केंद्राला पाठवणार : अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात 16 तारखे पासून सुरू होणाऱ्या लसीकरणासाठी पुणे महानगरपालिका द्वारे पूर्ण तयारी झाली असून पुण्यातील 8 ठिकाणी राज्य शासनाच्या मार्गदर्शन सुचना चा अवलंब करुन लसीकरण करण्यात येनार आहे. 16 तारखेला लसीकरण झाल्यावर तीन दिवस थांबून लसीकरणांच्या परिणामांचा अभ्यास करुन तो अहवाल केंद्राला पाठवण्यात येनार आहे व केंद्राच्या पुढच्या आदेशा वरुन पुन्हा लसीकरण सुरु करण्यात येनार आहे. अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.

अधिक माहिती देताना रुबल अग्रवाल म्हणाल्या कि पुण्यातील सरकारी राजीव गांधी, कमला नेहरु, ससून व सुतार हॉस्पीटल तथा खासगी मध्ये दिनानाथ, नोबेल, रुबी, भारती हॉस्पिटल मध्ये 16 तारखे ला सकाळी 9 ते 5 या वेळेत लसीकरण होणार आहे. रजिस्ट्रेशन केलेल्या प्रथम 100 आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. एक दिवस लसीकरण झाल्यावर तीन दिवस थांबून लसीकरणाचा परिणामांचा आढावा घेतला जानार आहे. याचा अहवाल केंद्राला पाठवून केंद्राच्या पुढच्या आदेशा वरुन लसीकरणा चे नियोजन करून लस देण्यात येईल. लसीकरणासाठी पुणे महानगरपालिकेला 60 हजार डोसेस देण्यात आले आहेत.