Pune News | पुणे जिल्हयात सुमारे 10000 अपार्टमेंट ! आता क्षेत्रफळानुसार अपार्टमेंटधारकांना द्यावा लागणार मेंटेनन्स, जाणून घ्या

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune News |अपार्टमेंटधारकांकडून (Apartment) क्षेत्रफळानुसार देखभाल शुल्क म्हणजेच मेटेनन्स (Maintenance) आकारण्याचे आदेश सहकार उपनिबंधक (Deputy Registrar of Co-operation) (पुणे शहर-1) यांनी दिले आहेत. अरणेश्वर येथील ट्रेझर पार्क अपार्टमेंटसंदर्भात हा निर्णय देण्यात आला आहे. दरम्यान, उपनिबंधकांनी अपार्टमेंटच्या मेटेनन्सबाबत दिलेला हा पहिलाच निर्णय आहे. या निर्णयामुळे अपार्टमेंटमधील अनेक मध्यमवर्गीयांना मोठा फायदा होणार आहे. दरम्यान, पुणे जिल्हयात सुमारे 10 हजार अपार्टमेंट आहेत. (pune news now apartment owners will now have to pay maintenance according to the area)

महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप कायद्यानुसार (Maharashtra Apartment Ownership Act) सभासदांकडून चौरस फूट आकारावर मेंटेनन्स आकारण्यात येतो.
परंतु ट्रेझर पार्क अपार्टमेंटमध्ये (Treasure Park Apartment) समान शुल्क आकारण्यात येत आहे. 2019-20 मध्ये काही सभासदांनी देखभाल खर्च भरला होता.
परंतु सभासदांकडून समान खर्चाच्या रकेमवर व्याज कारणी करुन वसुली करण्यात आली.
त्यामुळे टू-बीएचके फ्लॅटधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे चौरस फुटानुसार देखभाल शुल्क आकारण्याची मागणी करण्यात आली होती.
प्रमोद गरड, अतुल इटकरकर, नीलम पाटील, नरेंद्र चौधरी, प्रवीण भालेराव आणि संघर्ष समितीचे सदस्य विजय शिंदे यांनी उपनिबंधक यांच्याकडे यासंदर्भात मागणी केली होती.

असोसिएशनला शुल्क लावण्याचा अधिकार नाही

ट्रेझर पार्क (Treasure Park) असोसिएशनने डिसेंबर 2020 मध्ये यासंदर्भात उपनिबंधक यांच्याकडे लेखी म्हणणे सादर केले होते.
त्यानुसार वार्षिक देखभाल शुल्क सर्वसाधारण वार्षिक सभेत ठरवले जाते.
असोशिएशनला देखभाल शुल्क लावण्याचा अधिकार नाही.
चालु वार्षात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वार्षिक सभा घेता आली नाही.
परंतु, निर्दशनास आणून दिलेली सूचना वार्षिक सभेत मांडण्यात येणार आहे.

क्षेत्रफळानुसार मेंटेनन्सची आकारणी

पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पर्टवर्धन (Suhas Partwardhan) यांनी सांगितले की, अपार्टमेंट कायद्यानुसार अपार्टमेंटधारकांना त्यांच्या क्षेत्रफळानुसार मेंटेनन्स आकारणी करण्यात येते. मात्र, हा नियम सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांतील सभासदांना लागू होत नाही.
उपनिबंधक कार्यालयाकडून अपार्टमेंटधारकांच्या प्रश्न सोडवले जात आहेत.
याशिवाय, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण फेडरेशनही अपार्टमेंटचे प्रतिनिधित्व करत आहे.

Web Title : Pune News | now apartment owners will now have to pay maintenance according to the area, know about it

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Pimpri Crime News | आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन बिल्डर मेहतासह 7 जणांवर गुन्हा दाखल; पार्किंगसाठी सोय करुन देतो सांगून केली होती फसवणूक

Pune Crime News | लग्नाच्या आमिषाने तरूणीसोबत केली ‘मज्जा’ अन् दुसरीसोबत केला विवाह, तरूणावर बलात्काराचा FIR

Parenting Tips | मुलांना नकारात्मकतेपासून दूर ठेवा, त्यांना समजून घ्या !

Pune Crime News | हातात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारास गावठी पिस्तुलासह अटक