लोणीकंद पोलिसांनी दखल न घेतल्यामुळे आता ‘अंनिस’कडे पीडित महिलेची ‘तक्रार’

वाघोली : पोलीसनामा ऑनलाइन – लोणीकंद पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेरणे फाटा येथे पैशाच्या कारणातून गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर बलात्कार झाल्याची एक धक्कादायक घटना घडली आहे
ढोंगीबाबा व जादूटोण्याचा देखील वापर करत महिलेवर केला अत्याचार पुणे जिल्हातील नगर रोडवरील पेरणे फाटा येथे एका महिलेच्या पतीने घेतलेले उसने पैसे आणि त्या पैशातील व्यवहारातून महिलेशी ओळखीतून मैत्री निर्माण करून महिलेवर दहशत निर्माण करत महिलेवर जादूटोणा करून ढोंगीबाबा सोबत शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडून महिलेवर लैंगिक अत्याचार करून मारहाण केली तर एका डाॕक्टर कडून गर्भपात केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून याबाबतीत लोणीकंद पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पेरणे फाटा येथील पिडीत महिलेच्या पतीने काही आर्थिक अडचणीमुळे पेरणे गावातील राहुल वाळके यांचेकडून काही पैसे घेतले होते, त्यांनतर राहुल हा महिलेच्या घरी येऊ लागला आणि त्यानंतर त्यांची ओळख होऊन ओळखीतून मैत्री झाली त्यानंतर राहुल हा त्या महिलेशी दहशत निर्माण करून पैशाची मागणी करू लागला .तसेच महिलेकडे शरीर सुखाची मागणी करून नकार दिल्यास महागात पडेल अशी धमकी देत राहुल ने पिडीत महिलेवर लैंगिक अत्याचार केला.

त्यांन नंतर महिलेला गुंगीचे औषध देत स्वतः नशापान करून राहुल ने महिलेवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला असे लोणीकंद पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. यावेळी महिलेने नकार दिल्यानंतर तिच्यावर जादूटोणा करून महिलेला संमोहित करू लागला आणि त्यानंतर एका ढोंगी बाबा बरोबर महिलेला विविस्त्र करून कासव, गांडूळ व इतर पूजा चे साहित्य याची पूजा करून महिलेला शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडू लागला आणि आम्ही जादूटोणा करून तुमचे जगणे असह्य करू अशी धमकी देत भीती दाखविली त्यांनतर राहुल याने पिडीत महिलेवर वारंवार लैंगिक आत्याच्या करून महिलेला केसनंद येथील हॉस्पिटलमध्ये घेऊन जात महिलेच्या पतीच्या खोट्या सह्या करून महिलेला गर्भपात करण्यास भाग पाडले,त्यानंतर पिडीतेला सर्व काही प्रकार असाह्य झाल्यानंतर पुन्हा एकदा गुन्हा दाखल केला.

याबाबत पिडीत महिलेने पूर्वी लोणीकंद पोलीस स्टेशन येथे तक्रारी देखील दाखल केली होती मात्र लोणीकंद पोलीस स्टेशन कडून कुठल्याही प्रकारचे सहकार्य न मिळाल्याने महिलेने अंधश्रध्दा निर्मुलन समिती कडे याविषयाची तक्रार दाखल केली असून त्यामध्ये म्हटले आहे की आम्हाला न्याय मिळवून द्यावा.

आरोपी कडून महिलेला वारंवार त्रास देऊन केलेल्या कृत्याबाबत कोणासही काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली तर याबाबत पिडीत महिलेने लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणीकंद पोलिस मात्र कुठल्याही प्रकारचं सहकार्य न मिळाल्याने या प्रकरणात आता अंधश्रध्दा निर्मुलन समितीने देखील हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून पिडीतीला न्याय मिळवून देणार असल्याचे नंदिनी जाधव यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/