Pune News : ट्रेंड 24x कंपनीत गुंतवणूकीच्या बहाण्यानं दीड लाखाची फसवणूक, महिलेसह दोघांविरूध्द FIR

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – ट्रेंड 24x या कंपनीत पैसे गुंतवणूक केल्यास भरपूर नफा मिळण्याच्या आमिषाने एकाला दीड लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना भारती विद्यापीठ परिसरात घडली आहे. हा प्रकार 1 जानेवारी 2019 ते जानेवारी 2020 या कालावधीत घडला आहे.

याप्रकरणी रमेश कारंडे (वय 59) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार या कंपनीच्या महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बिबवेवाडी येथे राहण्यास आहेत. त्यांना एका अनोळखी व्यक्तीने फोन केला. तसेच ट्रेंड 24x या कंपनीत पैसे गुंतवणूक केली. तर तुम्हाला भरपूर नफा मिळेल असे सांगितले आणि त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्याकडून कंपनीत 1 लाख 48 हजार रुपये घेतले. पण 1 वर्षानंतर देखील त्याना कसलाच नफा दिला नाही. तसेच गुंतवणूक केलेली रक्कम देखील परत न करता त्यांची फसवणूक केली आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली व तक्रार दिली. यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक अविनाश ढमे हे करत आहेत.