Pune News : भरधाव लक्झरी बसने धडक दिल्याने 42 वर्षीय प्रौढाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव ट्रॅव्हलने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. रेसकोर्स बसस्टॉपजवळ हा अपघात 31 डिसेंबरला रात्री झाला आहे.

अमर नबीलाल तांबोळी (वय 42, रा. सिंहगड रोड, पानमळा) असे मृत्यु झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी ट्रॅव्हलचालक तानाजी सिद्धेश्वर दराडे (वय 28) याला वानवडी पोलिसांनी अटक केली. याबाबत पोलीस शिपाई महादेव जठार यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबरच्या रात्री अमर तांबोळी हे रेसकोर्स परिसरातून हडपसरच्या दिशेने जात होते. यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रॅव्हल्सने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक केली. यामध्ये अमर हे खाली कोसळून गंभीर जखमी झाले होते. यात तांबोळी यांचा जागीच मृत्यू झाला. अधिक तपास सहायक निरीक्षक विश्वजित जगताप करीत आहेत.