Pune News : भरधाव टँकरच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव टँकरने दिलेल्या धडकेने एका दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. कात्रज चौकातून राजस सोसायटीकडे जाताना हा अपघात झाला आहे. रामशिरोमणी भोलेनाथ मिश्रा (वय ६०, रा. कुमार पामके्रस्ट सोसायटी, पिसोळी) असे मृत्यु झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

याप्रकरणी चालक अनिल गोपीनाथ राजपंके (वय ३२, सध्या रा. वाशी, नवी मुंबई, मूळ. लातूर) याला अटक करण्यात आली. याबाबत मिश्रा यांचा मुलगा मनीष यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार रामशिरोमणी मिश्रा शुक्रवारी (२६ फेब्रुवारी) दुपारी दोनच्या सुमारास कात्रज चौकातून राजस सोसायटीकडे निघाले होते. त्यावेळी भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिली. यात मिश्रा हे खाली पडून गंभीर जखमी झाले. यात त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास सहाय्यक फौजदार मोहन देशमुख करत आहेत.