Pune News : भरधाव वाहनाच्या धडकेत सायकल चालकाचा मृत्यू

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – भरधाव वाहनाने पाठीमागून दिलेल्या धडकेत एका सायकल चालकाचा मृत्यू झाला. उपचार सुरू असताना त्यांचा काल मृत्यू झाला आहे. संगम ब्रिजजवळ हा अपघात झाला आहे.

किशोर मारुती रोकडे (वय 45) असे मृत्यु झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस फौजदार गोविंद शिंगाडे यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहा दिवसांपूर्वी ( दि. 17 जानेवारी) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास किशोर रोकडे हे सायकलने संगम ब्रिज परिसरातून जात होते. यावेळी भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये खाली पडून ते गंभीर जखमी झाले. यानंतर नागरिकांनी त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर उपचार सुरू असताना 27 जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास खडकी पोलीस करत आहेत.