Pune News : पुण्यातील ऑनलाइन क्रिकेट बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; गुन्हे शाखेकडून गौरव अहुजा, लाईन बॉय अजय शिंदेला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पोलिसांनी हॉर्स बेटिंगचा खेळ समोर आणल्यानंतर आता त्याच लिंकच्या माध्यमातून क्रिकेट मॅच बेटिंगचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. पैसे हरलेल्या एका हॉटेल व्यवसायिकाला लाईन बॉय अजय शिंदे आणि सचिन पोटे व त्यांच्या एका साथीदारांने धमकावत अडीच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लाईन बॉय आणि त्याचे साथीदार बेटिंगच्या खेळात ‘इनव्हॉल’ असल्याने शहरात खळबळ उडाली आहे. गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे.

याप्रकरणी 23 वर्षीय तरुणाने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गौरव आहुजा (रा. टिळक रोड) आणि लाईन बॉय अजय शिंदे (रा. खडक पोलिस लाईन) या दोघांना अटक केली आहे. तर सचिन पोटे फरार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हॉटेल व्यवसायिक आहेत. त्यांचे वाइन शॉपीचे देखील दुकान आहेत. त्यांची आरोपी गौरव आहुजा याच्याशी ओळख होती. गौरव हा ऑनलाइन बेटिंगचा जुगार चालवत असे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या दरम्यान फिर्यादीचा एक मित्र बेटिंगमध्ये अडीच लाख रुपये हारला होता तो पैसे न देताच गावी निघून गेला. यामुळे आरोपी फिर्यादी यांच्याकडे अडीच लाख रूपयांसाठी वेळावेळी संपर्क करीत होते.

या दरम्यान आरोपींनी फिर्यादी यांना फोनकरून तुझ्या खानदानाला गायब करतो, तसेच फिर्यादी यांचा मित्राला देखील तू मला ओळ्खत नाही का, मी अजय शिंदे खडक पोलीस लाईन बाहेर कोणालाही विचार, मॅचचे पैसे आहेत ते दे, असे म्हणत अडीच लाख रुपयांची खंडणी मागितली आहे, असे तक्रारीत म्हंटले आहे.

गेल्या महिन्यात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या सुचनेनुसार शहरात सुरू असलेल्या ऑनलाइन हॉर्स बेटिंगचा पर्दाफाश झाला होता. या कारवाईने शहरात चांगलाच धुमाकूळ घातला होता. बड्या हस्ती इनव्हॉल आसल्याचे बोलले जात होते. वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पोलिस निरीक्षक रजनिश निर्मल आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. त्या लिंकनुसार आता मॅच बेटिंग प्रकार समोर आआले आहे.