Pune News | जागृती ग्रुपतर्फे धान्य आणि कपडे संकलन मोहीमेचे आयोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | जुने – नवे कपडे , धान्य जमा करून अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रमांना देण्याचे काम ‘ जागृती ग्रुप पुणे ‘ संस्थेतर्फे केले जाते . गेल्या १२ वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून रविवारी ५ फेब्रुवारी २०२३ ला फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळात कपडे, धान्य, पुस्तक संकलनाची मोहीम राबविण्यात येणार आहे. (Pune News)

 

पुण्यातील महाविद्यालयीन तरुण-तरुणीं यांचा ” जागृती ग्रुप पुणे ” २००९ पासून प्रत्येक वर्षी फर्ग्युसन महाविद्यालयमध्ये अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रम व सामाजिक संस्थांना जुने-नवे कपडे, खेळणी, भांडी, पुस्तके, गरम कपडे, इतर उपयोगी वस्तू आणि जीवनावश्यक वस्तू गोळा करत आहे. दरवर्षी अनेक जुन्या आणि नवीन वस्तू गोळा करून त्या अनेक गरजू संस्थाना देण्यात येतात. हा उपक्रम गेले १२वर्षे अविरत चालू आहे. (Pune News)

 

या वर्षी संकलित झालेले कपडे हे गरीब व गरजू लोकांना, ऊसतोड कामगारांना व पुस्तके ग्रामीण भागातील विद्यार्थांना विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गरजूंपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

अधिक माहिती साठी ‘: 8788383841/7798953631संपर्क साधावा असे आवाहन जागृती पुणे च्या वतीने करण्यात आले आहे.

 

Web Title :- Pune News | Organized grain and clothes collection drive by Jagruti Group

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Bachchu Kadu | ‘मंत्रिमंडळ विस्तार केला नाही तर…’, बच्चू कडूंचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

Vanita Kharat | वनिता खरातच्या उखाण्याने वेधले सर्वांचे लक्ष; म्हणाली “सुमित तूच माझा महाराष्ट्र…”

Pune Pimpri Chinchwad Crime | भागिदार आणि कर्मचाऱ्याकडून कंपनीला 3 कोटींचा गंडा, भोसरी एमआयडीसी परिसरातील प्रकार

Pune Crime News | बेधूंद वातावरणात लोणावळ्यातील व्हिस्प्रींग वुड हॉटेलमध्ये सुरु होता अश्लिल डान्स ! पुणे ग्रामीण पोलिसांनी बंद केली छमछम; 53 जणांवर कारवाई, 9 महिलांचा समावेश