
Pune News | श्री उवस्सहग्गरं स्तोत्राच्या सामूहिक पठणाचे आयोजन
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | आर एम धारीवाल फाऊंडेशनच्या (R.M. Dhariwal Foundation) अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन (Janhavi Dhariwal Balan) व उपाध्यक्षा शोभा रसिकलाल धारीवाल (Shobha Rasiklal Dhariwal) यांच्याद्वारे,
उवस्सहग्गरं स्तोत्र सामूहिक पठनाचे भव्य आयोजन, पूज्य उपप्रवर्तिनी महासती श्री. सुमित्राजी म. सा. आदिठाना पाच यांच्या पावन सानिध्यात रविवार २१ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ४ ते ५ या वेळेत रसिकलाल माणिकचंद धारीवाल (Rasiklal Manikchand Dhariwal) स्थानक भवन, यश लॉन्स, बिबवेवाडी पुणे येथे केले आहे. (Pune News)
या सामूहिक पठनासाठी पुरुषांनी पांढरा पोशाख तर स्त्रियांनी केशरी पोशाखात उपस्थित राहावे तसेच कार्यक्रम वेळेवर सुरु होईल
अशी माहिती शोभा आर धारीवाल यांनी दिली . (Pune News)
जैन धर्मीयांमध्ये महामंगलकारी समजल्या जाणाऱ्या श्री उवस्सहग्गरं स्तोत्राच्या सामूहिक पठणाचा प्रथम कार्यक्रम २०१७ मध्ये दानशूर श्री. रसिकलाल माणिकचंद धारीवाल यांच्या उपस्थितीत झाला होता.
तसेच २०१८ मध्ये भारत गौरव, शांतिदूत जैन दिगंबर मुनी आचार्य श्री. पुलकसागरजी महाराज यांच्या मंगल सानिध्यात दहा हजार जैन अजैन भाविकांच्या उपस्थितीमध्ये झाला होता.
तर २०१९ मध्ये जैन आचार्य सम्राट डॉ. शिवमुनीजी म. सा. यांच्या उपस्थितीत पंधरा हजार जैन अजैन यांच्या उपस्थितीत झाला होता.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता व उवस्सहग्गरं स्तोत्रास खंड न पडू देता २०२० मध्ये पूज्य रमणीक मुनीजी
व २०२१ मध्ये पूज्य तारकऋषी म. सा. यांच्या उपस्थितीत यू -ट्यूब द्वारे ऑनलाईन उवस्सहग्गरं स्तोत्राचा
हजारो भाविकांनी घरूनच लाभ घेतला होता.
Web Title : – Pune News | Organized mass recitation of Sri Uvassahaggaram Stotra
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update