Pune News | आंतरराष्ट्रीय एम.आय.जी स्मार्टटेक प्रदर्शनाचे व परिषदेचे आयोजन ! पुणेकरांना विनामूल्य पाहण्याची तर उद्योजकांना सहभागी होण्याची सुवर्णसंधी

पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते होणार उद्घाटन; 6 व 7 मार्च रोजी पुण्यातील बालेवाडी येथे पार पडणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune News | पुण्यासाठी अभिमानास्पद असणाऱ्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय एम.आय.जी स्मार्टटेक प्रदर्शनाचे व परिषदेचे आयोजन येत्या ६ व ७ मार्च रोजी बालेवाडी येथील हॉटेल ऑर्किड या ठिकाणी दोन दिवस दिवसभर असणार आहे. ही परिषद महेश इंडस्ट्रियल ग्रुप (एम.आय.जी) पुणे स्थित एन.जी. ओ द्वारे भरवण्यात आली आहे. या प्रदर्शनामध्ये भारताच्या कानाकोपऱ्यातून उद्योग क्षेत्रातील अनेक नामांकित कंपन्या सहभागी झाल्या आहेत. प्रामुख्याने ३ हजारहून अधिक उद्योजक, ३५० पेक्षा जास्त त्यांचे प्रतिनिधी, २५ पेक्षा अधिक गुंतवणूकदार, २० हून अधिक उद्योग क्षेत्रातील मार्गदर्शक आणि ५ हून अधिक सरकारी आणि उद्योग क्षेत्रातील संघटना यात सहभागी झाल्या आहेत. सदरील प्रदर्शन हे पुणेकरांसाठी विनामूल्य आहे. असे एम.आय.जी चे अध्यक्ष मनोज बेहेडे  यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. या प्रसंगी शालिमार इंदानी, नितीन मुंदडा, आनंद करवा, मनोज बेहेडे, बजीरंग लोहिया, निलेश भट्टड, मुरलीधर सारडा आणि रवी काबरा आदी मान्यवर उपस्थित होते.(Pune News)

इंडियन नॅशनल सायन्स अकादमीचे अध्यक्ष प्रख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. उत्पादन क्षेत्रात जागतिक दर्जाचे नेतृत्व तयार करणे. हा मूळ उद्देश आहे. एमएसएमई वर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. नॅशनल प्रोग्राम डायरेक्टर-इज ऑफ डुइंग बिझनेसचे अभिजित सिन्हा,  नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडियाचे डॉ. गणेश नटराजन (अध्यक्ष, हनीवेल ऑटोमेशन) थीम संदर्भात बोलतील. नॅशनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एन.आर. डी. सी) हे या परिषदेमध्ये भागीदार आहेत, तर अवजड उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील सी.४. आय ४ चे लॅब ही हे देखील भागीदार आहे.

दोन दिवस चालणाऱ्या परिषदेमध्ये देशभरातील तसेच महाराष्ट्रातील उद्योजकांना सहशुल्क सहभागी होता येणार आहे. या परिषदेमध्ये उद्योजकांना विविध प्रकारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कॉम्प्युटर अँड मीडिया डीलर्स असोसिएशन (सी एम डी ए ), देखील ए.आय.जी सी जोडले गेले आहेत. दोन दिवसीय कॉन्क्लेव्ह मार्केट ऍक्सेस, सस्टेनेबिलिटी, ऑटोमेशन आणि इंडस्ट्री ४.० आणि स्मार्ट टेक्नॉलॉजी या चार स्तंभांवर आधारित आहे.  एमएसएमई आणि स्टार्टअपला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होण्यासाठी सक्षम बनवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. उद्योजक, नवोन्मेषक आणि तज्ज्ञांना ज्ञान, साधने आणि उपाय सामायिक करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करण्यासाठी एका तांत्रिक परिषदेचा समावेश होतो आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान प्रदर्शित करण्याच्या संधी प्रदान करण्यासाठी परिषद भरवली आहे.

डॉ. आनंद देशपांडे (संस्थापक आणि अध्यक्ष – पर्सिस्टंट सिस्टम),  ऋषी बागला (एमडी, बगला ग्रुप), प्रदीप भार्गव (अध्यक्ष, एम ई सी एफ) लिमिटेड), रमण नंदा (  नेतृत्व मार्गदर्शक आणि प्रशिक्षक), विविध सत्रांमध्ये प्रतिनिधींशी संवाद साधतील. “आत्मनिर्भर भारतासाठी एम.सी.एम. ई चे सक्षमीकरण” हे विशेष सत्र नियोजित आहे. तेथे प्रदीप पेशकर (राष्ट्रीय एम.एस.एम. ई  बोर्डाचे सदस्य) आणि सी.एम. डी  अमित रस्तोगी (निवृत्त) ( सिएमडी एन आर डी सी) हे ( एम एस एम ई एस)  सरकारसोबत जलद गतीने वाढ कशी करू शकतात यावर चर्चा करतील. 

मार्टेलो काबिलो (उपाध्यक्ष-ऑपरेशन्स, ऍटलस कॉप्को इंडिया प्रायव्हेट लिमिटेड),  मिलिंद तलाठी
(संचालक, एलंटास बेक इंडिया लिमिटेड),  सतीश मानधना (एमडी, एव्हरसोर्स कॅपिटल), गौरव त्रिपाठी
(सह-संस्थापक आणि  ग्रुप सीटीओ, इनोप्लेक्सस),  अभिजीत काबरा (सीईओ, सास्केन टेक्नॉलॉजीज लिमिटेड), सुनील मेहता (महाव्यवस्थापक, मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडिया) मयूर सेजल (आयपीओ सल्लागार आणि संपत्ती व्यवस्थापन),   सिद्धार्थ जबाडे (कुलगुरू), विश्वकर्मा विद्यापीठ), डॉ.वसंत बंग.  (संस्थात्मक विकास आणि धोरणात्मक व्यवस्थापन सल्लागार) हे देखील परिषदेमध्ये तज्ञ पॅनेलमधील काही सदस्य असतील.

प्रोडक्ट इनोव्हेशन आणि ब्रँड बिल्डिंग ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्लाउड कॉम्प्युटिंग आणि रोबोटिक्स
आणि ऑटोमेशन ते नेट झिरो आणि लोक आणि प्लॅनेटसाठी चिंता या विषयांचा विस्तृत स्पेक्ट्रम तज्ञांकडून विचार
केला जाईल, काही केस स्टडी आणि यशोगाथा जोडतील  या विचारमंथनांचे मूल्य केले जाईल. परिषदेचे आणखी एक
मनोरंजक वैशिष्ट्य म्हणजे स्टार्टअप एरिना जेथे स्टार्टअप्स त्यांची उत्पादने प्रदर्शित करू शकतात आणि स्टार्टअप्समधील
गुंतवणुकीच्या संधी शोधण्यासाठी एक गुंतवणूकदार संमेलन असेल.

एम आय जी चे  उपाध्यक्ष जितेंद्र लखोटिया यांनी आंतरराष्ट्रीय एम.आय.जी स्मार्टटेक परिषदे सहभागी होऊन
प्रत्येक उद्योजकाने स्वतःला समृद्ध करण्याचे आणि विकासाच्या मार्गासाठी तयार होण्याचे आवाहन केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Executive Engineer Kiran Deshmukh Suspended | पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख निलंबित, जाणून घ्या कारण

Pune Navale Bridge Accident | पुणे: नवले पुलाखाली विचित्र अपघात; 8 ते 9 वाहने एकामेकांना धडकली (Video)

PM Narendra Modi In Yavatmal | पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारीला यवतमाळमध्ये, लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची शक्यता

Sanjay Raut On BJP | राऊतांचा मोठा दावा, दोन्ही गटांना नड्डांनी सांगितले की, ”धनुष्यबाण, घड्याळाला लोक मतदान करणार नाहीत, त्यामुळे…”

Pune NCP News | प्रशांत जगताप यांच्यासह शरद पवार गटाच्या 9 जणांवर गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण (Videos)

बसची वाट पहात थांबलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, हडपसर येथील प्रकार