Pune News | सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार पेठ, रास्ता पेठ परिसरात विविध विकास कामांच्या कार्यक्रमांचे आयोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune News | पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर (PMC Leader of the House Ganesh Bidkar) यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार पेठ, रास्ता पेठ परिसरात विविध विकास कामांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी २२ ऑक्टोबरला सकाळी दहा ते बारा यावेळेत हे कार्यक्रम होणार आहेत. प्रभागातील रस्ता अर्बन स्ट्रीट गाईडलाईन्स नुसार विकसित करणे, पावसाळी लाईन, ड्रेनेजलाईन टाकणे, आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत नागरिकांना आरोग्य कार्डचे वाटप करणे (Pune News) असे कार्यक्रम होणार आहेत.

महानगरपालिकेत (Pune Corporation) सभागृह नेते म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर गेल्या दहा महिन्यांमध्ये सभागृह नेते बिडकर यांनी अनेक विकास कामांचे प्रस्ताव मार्गी लावले आहेत.
शहरातील अनेक भागातील अर्धवट असलेली कामे पूर्ण करण्याबरोबरच पुणेकरांना फायदेशीर ठरणाऱ्या प्रकल्पांच्या कामासाठी आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करुन देण्यासाठी
बिडकर यांनी पुढाकार घेतला आहे.
पाच वर्षांपूर्वी ज्या विश्वासाने पुणेकरांनी भारतीय जनता पक्षाला (भाजप) महानगरपालिकेत एकहाती सत्ता दिली.
त्यांचा विश्वास सार्थ ठरविताना भाजपने सत्ताधारी म्हणून अनेक महत्वाचे प्रकल्प मार्गी लावले असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे.

 

सोमवार पेठ, रास्ता पेठ तसेच मंगळवार पेठेतील नागरिकांच्या सोयीसाठी सभागृह नेते बिडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या भागात ‘स्मार्ट प्रभाग – स्मार्ट रस्ता’ संकल्पना राबविली जाणार आहे.
१५ ऑगस्ट चौक ते नरपतगिरी चौक या मुख्य रस्ता खोदून त्याचे काँक्रीटीकरण केले जाणार आहे.
सोमवार पेठ नागेश चौकातील मुख्य रस्ता खोदाई करून तेथे पावसाळी लाईनटाकणे, ड्रेनेज लाईन टाकणे या कामाची सुरुवात होणार आहे.
तसेच आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत नागरिकांना आरोग्य कार्ड तसेच तुळशीचे रोप वाटप केले जाणार आहे.
सोमवार पेठेतील जनसंपर्क कार्यालयात हा कार्यक्रम (Pune News) होईल.

 

Web Title : Pune News | Organizing various development work programs in Somwar Peth, Rasta Peth area on the occasion of PMC Leader of House Ganesh Bidkar’s birthday

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

CM Uddhav Thackeray | मुंबईतील अनधिकृत बांधकामांबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कठोर, दिले ‘हे’ स्पष्ट आदेश

Pune Corona | दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळं एकही मृत्यू नाही; 118 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

PM Kisan च्या 10 व्या हप्त्यासाठी रजिस्ट्रेशन दरम्यान तुमच्याकडून चूक तर झाली नाही ना? जाणून घ्या – कशी करू शकता दुरुस्त?