Pune News : मातंग समाजाच्या आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन

पुणे : मातंग समाजाचे स्वतंत्र आरक्षण ,अण्णाभाऊ साठे महामंडळ सुरू करावे,यासह इतर मागण्यासाठी दलित महासंघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले . दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.मच्छिंद्र सकटे यांनी या आंदोलनाचे नेतृत्त्व केले .

या वेळी प्रा. .डॉ.मच्छिंद्र सकटे म्हणाले की अलीकडे महाराष्ट्रात मराठा आरक्षण ,ओबीसी आरक्षण ,धनगर आरक्षण याबाबत आघाडी सरकार विशेष भूमिका घेताना दिसत आहे. परंतु मातंग समाजाच्या आरक्षणाकडे हे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा गंभीर आरोप सकटे यांनी केला आहे .त्यामुळे हे सरकार मातंग समाजाच्या बाबतीत विरोधी भूमिका घेत आहे त्यामुळेच याचा निषेध करण्यासाठी आज पुण्यात आक्रोश आंदोलन करण्यात येत आहे .आमच्या मागण्या लवकर मान्य नाही केल्यास दलित महासंघ राज्यभर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सकटे यांनी यावेळी दिला .

या आंदोलनात मातंग समाजाच्या आरक्षणासह बार्टी च्या धर्तीवर मातंग समाजासाठी आर्टी चि स्थापना करावी , सर्व मागासवर्गीय महामंडळाचे कर्ज माफ करावे ,अण्णाभाऊ साठे महामंडळ त्वरित सुरू करावे ,दलित महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शासनाने ठोस कृती कार्यक्रम राबवावा.या प्रमुख मागण्यांवर लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात डॉ.मच्छिंद्र सकटे,महिला आघाडी प्रमुख पुष्पलता सकटे, नगरसेविका स्वातीताई लोखंडे ,उपाध्यक्ष लक्ष्मी पवार ,शहरादयक्ष जाधव ,अशोक लोखंडे ,मनोज अडागळे,विकास भोंडवे ,खंडू पवार यासह राज्यातील व पुणे शहरातील प्रमुख कार्यकर्ते ,महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .