Pune News : वडगावशेरी मतदारसंघातील विविध प्रलंबित रस्त्यांची अति. आयुक्त कुणाल खेमनार, आमदार सुनिल टिंगरे यांच्याकडून पाहणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  वडगावशेरी मतदारसंघातील पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार व आमदार सुनिल टिंगरे यांनी वडगावशेरी मतदारसंघाच्या विविध रस्ते संदर्भात स्थळ पाहणी करण्यात आली. या वेळी प्रामुख्याने ५०९ चौक ( बर्माशेल झोपडपट्टीच्या बाजूने जाणारा) ते धानोरी जकातनाका कडे जाणारा २०५ रस्त्याची पाहणी करण्यात आली. सदर रस्ता नंदा मालकीच्या जागेतून वायुसेनेच्या संरक्षण भिंतीला लागून जाणारा रस्ता होणे गरजेचे असल्याचे आमदार सुनिल टिंगरे यांनी निदर्शनास आणुन दिले. या वेळी ब्रम्हा स्काय सिटी सोसायटीचे चेअरमन डाॅ. निजानंद खामकर व सोसायटी मधील इतर सभासदांनी अतिरिक्त आयुक्तंना हा रस्ता त्वरीत चालू करण्यासाठी निवेदन ही दिले.

vadgaon

पोरवाल रोडला पर्यायही रस्ता म्हणून धानोरी जकातनाका ते डि.वाय. पाटील काॅलेजचा २०५चा डि.पी रस्त्यासाठी निविदा निघाली असून त्याचे काम लवकरात लवकर चालू करण्याची मागणी आमदार सुनिल टिंगरे यांनी केली. धानोरी स.नं ६ मधील संरक्षण खात्याकडून आवडण्यात आलेला सेवेंत हेवन सोसायटी कडे जाणार्या डि.पी मधील गाव रस्त्याची पाहणी करण्यात आली.

vadgaon

विमान नगर येथील कोणार्क नगर सोसायटी समोरील देवकर यांच्या मालकीचा रस्ता संदर्भात भूसंपादन अधिकार्यांसोबत चर्चा व पाहणी करण्यात आली.

या वेळी अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी या सर्व रस्त्यांची लवकरच बैठक लावणार असल्याचे सांगितले. या वेळी प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक अनिल टिंगरे, रोड विभागाचे खाते प्रमुख वि.जी. कुलकर्णी व पुणे महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.