Pune News | राष्ट्रवादी काँग्रेसच्या महारक्तदान शिबिरास उदंड प्रतिसाद; 1883 ‘युनिट’चे संकलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (deputy chief minister ajit pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात (Pune News) आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिराला (blood donation camp) नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. ‘निश्चय गरजवंतांच्या आरोग्यसेवेचा, संकल्प 6200 प्राणांसाठी महारक्तदानाचा’ या ब्रीदवाक्याखाली आयोजन करण्यात आलेल्या या शिबिराचा शुभारंभ वन राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता भरणे (minister dattatray bharane) यांच्या हस्ते पुण्यात (Pune News) रविवारी झाला.

‘कोरोना परिस्थितीमुळे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यास आलेल्या मर्यादा, नागरिकांच्या मनात असलेली भीती, कोरोनासारखी जीवघेणी परिस्थिती या कारणांमुळे मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम महत्त्वाचा आहे. रक्त ही अशी नैसर्गिक संपत्ती आहे, जी दुसऱ्यांना देत राहिलो, तरी कधी कमी होत नाही. आपण आपले कुटुंब म्हणजे आपली रक्ताची नाती असे म्हणतो. परंतु, रक्तदानाच्या माध्यमातून आपण कितीतरी जणांशी रक्ताचे नाते जोडत असतो. आपल्याशी कुणाचे रक्ताचे नाते जोडले आहे, हे त्या रुग्णालाही माहीत नसते. परंतु, ज्याला रक्तामुळे जीवनदान मिळाले आहे, ती व्यक्ती हे अनोखे नाते आयुष्यभर जपत असते. त्यामुळे, अजितदादांच्या विचारसरणीवर आधारित कृती कार्यक्रमाचा व आरोग्यसेवेचा उपक्रम राबविण्यात आल्याबद्दल मी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे आभार मानतो,’ असे प्रतिपादन दत्ता भरणे (minister dattatray bharane) यांनी केले. याप्रसंगी 1883 रक्तसंकलन झाले.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

या वेळी दत्ता भरणे यांनी नव्याने उभारण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाची पाहणी केली.
अद्ययावत कार्यालय उभारल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त करून,
कार्यालयाच्या माध्यमातून सर्वांना अभिमान वाटेल, असे उत्तुंग कार्य घडेल, असा विश्वासही व्यक्त केला.

या प्रसंगी पत्रकार मंगेश कोळपकर (Sakal Senior Reporter Mangesh Kolapkar) यांची पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या (pune patrakar sangh) अध्यक्षपदी निवड (puwj pune) झाल्याबद्दल तसेच जितेंद्र अष्टेकर (Maharashtra Times Senior Reporter Jitendra Ashtekar) यांची पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या (pune patrakar pratishthan) अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा दत्ता भरणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. संदीप बालवडकर, किशोर कांबळे, योगेश सुतार, शैलेंद्र कदम, निखिल बालवडकर यांनी सदर कार्यक्रमाचे संयोजन केले.

या वेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप (ncp city president prashant jagtap),
अंकुश काकडे, बाबुराव चांदेरे, श्रीकांत शिरोळे, विकास दांगट,
प्रदीप देशमुख (ncp youth leader pradeep deshmukh),
बाळासाहेब बोडके आदी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रवादीच्या वतीने डॉक्टरांचे पथक रायगडला रवाना

रायगड जिल्ह्यातील तळीये गावात दरड कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी झाली आहे.
या परिस्थितीत सामाजिक बांधिलकी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने डॉ. राजेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे दोन पथक सेवेसाठी रविवारी रायगडला रवाना झाले.
या पथकासोबत आवश्यक औषधांचा साठाही पाठविण्यात आला आहे.

एक कुटुंब, एक झाड
वृक्ष लागवड व संवर्धनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ‘एक कुटुंब, एक झाड’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
वृक्ष संवर्धन समितीचे सदस्य मा. मनोज पाचपुते यांच्या प्रयत्नांतून आणि वनराज्यमंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते रविवारी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांत रोपांचे वाटप करण्यात येणार आहे.

Web Title :- Pune News | Overwhelming response to the NCP’s blood donation camp; 1883 units Collection

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

SmartPhone | चिंताजनक ! स्मार्टफोनने 59 % मुले करताहेत ‘चॅटिंग’, 10 टक्केच विद्यार्थ्यांकडून अभ्यासासाठी वापर; स्टडी रिपोर्टमध्ये आश्चर्यकारक खुलासा

Pune Corporation | महापालिकेतील भाजप पदाधिकार्‍यांची ‘एकाधिकारशाही’? कार्यकर्त्यांची हाती ‘घड्याळ’ बांधायला सुरूवात, नगरसेवक शेवटच्या टप्प्यात करणार ‘करेक्ट’ कार्यक्रम?

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 250 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी