Pune News : शिरूरमध्ये वाळू सप्लाय करणाऱ्या मित्रांमध्ये भागीदारीतून वाद, मित्रानेच गोळ्या झाडून दुसऱ्या मित्राचा केला खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  शिरूर तालुक्यात वाळू सप्लाय करणाऱ्या मित्रांमध्ये भागीदारीतून झालेल्या वादात मित्रानेच गोळ्या झाडून दुसऱ्या मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.

स्वप्नील छगन रणसिंग (वय 31, रा. शिरूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील आरोपी व स्वप्नील आहेत. दरम्यान त्यांचा वाळू सप्लायचा भागीदारीत व्यवसाय आहे. मात्र तीन दिवसांपूर्वी त्यांच्यात काही कारणावरून वाद झाले होते. त्यावरून आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास अचानक दोघांनी दुचाकीवर येत स्वप्नीलवर गोळ्या झाडल्या. त्याने दोन गोळ्या झाडल्या. यात स्वप्नील गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपींचा मग काढला जात आहे.