Pune News : रुग्णाची डॉक्‍टरला काठीने मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांच्या औषधोपचाराने बरे न वाटल्याने त्या औषधोपचाराचा खर्च एका रुग्णाने डॉक्‍टरकडे उपचाराचे पैसेच परत मागितले. पण डॉक्‍टरने पैसे देण्यास नकार देताच रुग्णाने त्याच्या क्‍लिनिकची व कारची तोडफोड करत डॉक्टरला काठीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. खडकी येथील नवा बाजार परिसरात ही घटना घडली आहे.

याप्रकरणी डॉ. रितेश किर्तीकुमार शहा (वय 45, रा. खडकी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विमानतळ पोलिस ठाण्यात सचिन नावाचा रुग्ण व त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहा यांचा विमानतळ परिसरात दवाखाना आहे. त्यांनी सचिन या रुग्णावर लघविच्या जागेवर उपचार केले होते.

मात्र औषधोपचार केल्यानंतरही आजार बरा झाला नसल्याचे रुग्णाचे म्हणणे होते. यासाठी खर्च झालेले पैसे रुग्ण परत मागत होता. यासाठी त्याने क्‍लिनिकमध्ये साथीदारांसह घुसून शिवीगाळ करुन काठीने मारहाण केली. क्‍लिनिकची तोडफोड करुन कारची काचही फोडली. अधिक तपास सहायक निरीक्षक राहुल पाटील हे करत आहेत.