Coronavirus in Pune : पुणेकरांनो सावधान ! पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी 75 जणांचा पत्ताच नाही

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुण्यातील रोजच्या कोरोना बाधितांमध्ये जवळजवळ ७५ जणांचा पत्ताच लागत नसल्याने त्याच्या संपर्कासाठी महानगरपालिकेने पुन्हा एकदा पोलिसांकडे धाव घेतली आहे. रुग्णबाधितांची माहिती मिळत नसल्याने पोलिसांनी त्यांना सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे. शहरात दररोज २ ते अडिच हजारांच्या आसपास नवे कोरोनाची रुग्णसंख्या आढळून येत असल्याने, ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यांना महापालिकेची यंत्रणा फोन करून ते कोठे ऍडमिट झाले त्यांच्या संपर्कात कोण आले याची माहिती घेतात आणि त्यापैकी कोणाला लक्षणे असतील तर त्यांची चाचणी केली जाते. परंतु रुग्णाचा पत्ताच लागत नसल्याने असा एक प्रश्न निर्माण झाला आहे.

तसेच, दररोज सुमारे ७५ रुग्णांचे पत्ते त्याची माहिती आरोग्य यंत्रणेला लागत नाही.आणि त्यांच्याशी संपर्कही होत नाही, अशावेळी त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचाही काहीच पत्ता लागत नाही, असे लोक म्हणजे समाजात फिरणारे ‘कोरोना बॉंब’ आहेत असेच म्हणायला हरकत नाही. या सगळ्या गोष्टींमुळे महापालिका कर्मचाऱ्यांना रुग्णबाधितांना संपर्क करण्यासाठी (कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग) खूप अडथळे समोर येत आहे. त्यामुळे त्यांनी आता पुन्हा एकदा पोलीसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला असून, रोजच्या रोज या ‘मिसींग’चा तपशील पोलीसांना जाणार असून, त्यांच्या पद्धतीने याचा तपास घेतील, अशी माहिती महापालिकेतील सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांनी दिली आहे.