Pune News : ‘पिपल्स मिडिया इंडिया’ वेब पोर्टलचे डॉ. नीलमताई गोर्‍हे यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिपल्स मीडिया इंडिया  www.peoplesmediaindia.com या ऑनलाइन न्यूज वेब पोर्टलचे उद्घाटन विधानपरिषद उपसभापती मा. डॉ. नीलमताई गोर्‍हे यांच्या हस्ते करण्यात आले.

सिल्व्हर रॉक्स या त्यांच्या निवासस्थानी झालेल्या उद्घाटन प्रसंगी पोर्टलचे संपादक राजेंद्र सोनार होते. या पोर्टलमध्ये बातम्या, तसेच उद्योजकांची माहिती, सामाजिक संस्थांच्या कार्याची – उपक्रमांची माहिती आहे.