Pune News | शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या विचारधारेचा कडेलोट

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आणि शिवाजी महाराजांवर भाजप नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनांचा निषेध करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी विरोधी पक्षांकडून आंदोलने केली जात आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जास्त नावीन्यपूर्ण पद्धतींचा वापर करत आहे. त्यांचे पुण्यातील माजी महापौर आणि प्रवक्ते अंकुश काकडे यांनी इडली, सांबार आणि मसाला डोशाचा बहिष्कार केला आहे. त्यानंतर पुणे शेजारच्या महानगरपालिकेच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजूनच अनोखी शक्कल लढविली आहे. (Pune News)

 

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींच्या विचारधारेचा निषेध म्हणून पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिकात्मक पुतळ्याचा कडेलोट करण्यात आला आहे. या प्रतिकात्मक पुतळ्याचा कडेलोट शहरातील चिखली परिसरात असणाऱ्या ऐतिहासिक जाधव गडावरून करण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. (Pune News)

 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्ये केली होती. या आंदोलनात “या राज्यपालांचे करायचं काय? खाली डोकं वर पाय?” अशा घोषणा देत कडेलोट करण्यात आला.

 

Web Title :- Pune News | pimpri chinchwad ncp protest against controversial statements about chhatrapati shivaji maharaj

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा