Pune News | पोलीस अधिकाऱ्याची थेट 234 किलोमीटर सायकल स्वारी; फिटनेसबाबत संदेश देत ‘देहू ते पंढरपूर’ वारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | कोरोनाच्या (Coronavirus) दोन लाटेनं लोकं हतबलं झाली (Pune News) आहेत. आर्थिक बाबीनंतर लोकांच्या प्रतिकारशक्तीमध्ये देखील बदल झाला आहे. कोरोनाच्या महामारीनंतर प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पौष्टिक आहार आणि योग्य व्यायाम या गोष्टीची आवश्यकता अधिक भासत आहे. त्यामुळे युवकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत लोक फिटनेसवर लक्ष करत असल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर फिटनेसचा एक मेसेज देत एका पोलीस अधिकाऱ्याने तब्बल 234 किलोमीटर सायकल स्वारी केली आहे.

हिंजवडी पोलीस ठाण्याचे (Hinjewadi Police Station) सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे (API Ram Gomare) यांनी चक्क देहू ते पंढरपूर (Dehu to Pandharpur) वारी केली आहे. मागील दोन वर्षापासून त्यांनी मेहनत घेत सायकलिंग, स्विमिंग आणि धावण्याचा व्यायाम सुरू केला आहे. पिंपरी चिचंवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (Commissioner of Police Krishna Prakash) हेही फिटनेसच्या बाबतीत नेहमीच जागरूक असतात. त्यांचाच एक आदर्श समोर राखत राम गोमारे यांनी देखील फिटनेसला अधिक महत्व दिलं आहे. परंतु, आपण स्वतः तर धडधाकट राहूच पण पोलीस सहकारी, इतर मित्रांनाही फिटनेसचे महत्त्व पटवून देऊ असा संदेश त्यांनी दिला आहे. (Pune News)

देहूमध्ये संत तुकाराम महाराज यांच्या मंदिरात दर्शन घेत गोमारे यांनी पंढरपूरपर्यंत सायकल प्रवास केला आहे. फक्त एका ठिकाणी 10 मिनिटांचा थांबा घेत गोमारे यांनी पंढपूरात दाखल झाले आहे. सलग 8 तास सायकल चालवत गोमारे यांनी 234 किलोमीटर प्रवास पार केला. त्यामुळे गोमारे यांनी पंढरपूर पर्यंत फिटनेस वारीच केली आहे. त्याचबरोबर गोमारे यांनी सर्वांना आवाहन केलं आहे. कोरोनाकाळात पौष्टिक आहार आणि योग्य व्यायाम करणं गरजेचं आहे, दररोज किमान 1 तास स्वतःसाठी देऊन व्यायाम करण्याचे आवाहन केलं आहे.

Web Title : pune news pimpri chinchwad police officer dehu to pandharpur cycle ride to prove the importance of fitness

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Google Pay-Paytm-ATM | गुगल पे आणि पेटीएमचा वापर करून ATM मधून काढून शकता पैसे,

केवळ क्यूआर कोड (QR Coad) करावा लागेल स्कॅन

Intermittent Fasting | काय असतं इंटरमिटेंट फास्टिंग? जाणून घ्या वजन कमी करायची जबरदस्त पद्धत

Blood Sugar | मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ अत्यंत ‘घातक’, जाणून घ्या खाण्याच्या कोणत्या गोष्टींपासून रहावं दूर

Omicron Covid Variant | हलक्यात घेऊ नका ‘ओमिक्रॉन’ला, वाढवू शकतो तुमच्या अडचणी;
जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय

Calcium For Bones | ‘या’ 10 कॅल्शियमयुक्त खाद्यपदार्थांचे करा सेवन, हाडे होतील मजबूत;
जाणून घ्या कमतरतेची लक्षणे

Aloe Vera Uses And Side Effects | कोरफडीचा वापर करणाऱ्या महिलांवर होतात ‘हे’ 5 दुष्परिणाम; जाणून घ्या

Sore Throat Problems | सर्दीपासून घसादुखीपर्यंत, गरम पाण्याचे सेवन हा एक प्रभावी घरगुती उपाय