
Pune News | PM मोदी – HM शहांनी देशाची लोकशाही संपवण्याचे काम केले, राष्ट्रवादीचा केंद्र सरकारवर ‘हल्लाबोल’
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | उत्तर प्रदेशातील लखीमपूर (Lakhimpur Uttar Pradesh) येथे शांततापूर्वक आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना भाजपच्या (BJP) केंद्रीय राज्यमंत्री यांच्या ताफ्यातील वाहनांनी चिरडले. या घटनेच्या निषेधार्थ आज पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या (Agriculture College pune) चौकात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस (Congress), शिवसेना (Shivsena), सिपीआय (CPI) व शेतकरी बचाव कृती समितीच्या (shetkari bachav kruti samiti) वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. जेंव्हा पासून मोदी-शहा सत्तेत आले आहेत तेंव्हापासून देशाची लोकशाही संपवण्याचे काम ते करत असल्याचा घणाघात प्रशांत जगताप (Pune News) यांनी केला.
उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथील हिंसक आणि अमानवीय कृत्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी व शहिद शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी निषेध आंदोलन करण्यात आले होते.
लखीमपूर घटनेने केवळ शेतकऱ्यांना नाही तर लोकशाहीला चिरडले आहे.
काल उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य (Keshav Prasad Maurya) व केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा
(Ajay Kumar Mishra) हे एका दौऱ्यावर जात असताना आंदोलक शेतकऱ्यांनी कृषी कायदे (Agricultural laws) मागे घ्यावेत अशी मागणी केली व सरकारचा निषेध करत काळे झेंडे दाखवले.
याचाच राग मनात धरून मिश्रा यांच्या मुलाने आंदोलक देशाचे अन्नदाते असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचे पातक केले आहे.
असे प्रशांत जगताप यांनी आंदोलनातील शहिद शेतकऱ्यांना श्रध्दांजली अर्पण करून आपल्या संतप्त भावना व्यक्त (Pune News) केल्या.
प्रशांत जगताप म्हणाले की, मागील दहा महिन्यात या मग्रूर मोदी सरकारने (Modi government) सहाशे तीन शेतकऱ्यांचा बळी घेतला आहे.
जेंव्हा पासून मोदी-शहा सत्तेत आले आहेत तेंव्हापासून देशाची लोकशाही संपवण्याचे काम ते करत आहेत. हळूहळू त्यांनी देशच विक्रीला काढला आहे.
आत्तापर्यंत शेतकऱ्यांवर अशा प्रकारचा अन्याय करणारा पंतप्रधान (PM) देशाला मिळाला नव्हता. आता जनतेने डोळे उघडण्याची गरज आहे.
हे आंदोलन सत्तेसाठी किंवा पक्षासाठी नसून देशातील अन्नदात्यासाठी आहे. असे प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी सांगितले.
यावेळी माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील (Former Justice BG Kolse Patil), माजी मंत्री तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे (Ramesh Bagwe),
माजी आमदार मोहन जोशी (Mohan Joshi), अभय छाजेड (Abhay Chhajed),कम्युनिस्ट पक्षाचे अजित अभ्यंकर (Ajit Abhyankar), नितीन पवार ,
प्रदीप देशमुख (pradeep deshmukh) यांच्यासह महिला व पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Web Title : Pune News | PM Modi – HM Shah worked to end democracy in the country, NCP’s ‘attack’ on central government
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Cyber Crime | पुण्यातील फॅशन डिझायनर तरूणीला 7 लाखांचा गंडा, जाणून घ्या प्रकरण
Chandrakant Patil | ‘…तर विधानसभेला शिवसेनेच्या फक्त 5 जागा आल्या असत्या’
Devendra Fadnavis | ‘…तोपर्यंत या सरकारला जगू देणार नाही’ – ठाकरे सरकारला फडणवीसांचा इशारा