Pune News | शहरी गरिब योजनेच्या ‘लाभार्थीं’च्या नावे शहरात मालमत्ता, 622 कार्डधारकांना नोटीस; शहरातील ‘त्या’ 11 मोठ्या रुग्णालयात यापुढे शहरी गरिब योजना नाही !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गरिब कुटुंबातील पुणेकरांवरील उपचारासाठी पुणे महापालिकेने (PMC) दहा वर्षांपुर्वी सुरू केलेल्या ‘शहरी गरिब योजनेचा’ फेरआढावा घेण्यास सुरूवात केली आहे. पहिल्या टप्प्यात या योजनेच्या ‘लाभार्थींंचे’ उत्पन्न हे या योजनेचे कार्ड काढताना सादर करण्यात आलेल्या ‘उत्पन्न’ दाखल्यानुसारच आहे का, याची तपासणी सुरू केली असून यासाठी मिळकतकर विभागाकडील नोंदी तपासण्यास सुरूवात झाली आहे. आतापर्यंत झालेल्या तपासणीमध्ये ६२२ कार्ड धारक हे रितसर महापालिकेकडे मिळकतकर भरत असून त्यांना नोटीस पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.

महापालिकेच्यावतीने PMC एक लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या नागरिकांवर आरोग्य उपचार करण्यासाठी दहा वर्षांपुर्वी शहरी गरिब योजना सुरु करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत उपचारासाठीचा एक लाख रुपयांचा खर्च महापालिका देते.
आतापर्यंत एक लाखांहून अधिक पुणेकरांनी या योजनेचा लाभ घेतला असून ह्दयरोग तसेच कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावरील उपचारासाठी ही मर्यादा नुकतेच २ लाख रुपये करण्यात आली आहे.
यासंदर्भात माहिती देताना रुबल अग्रवाल यांनी सांगितले, की आज आरोग्य योजनांबाबत बैठक घेण्यात आली.
या बैठकीमध्ये शहरी गरिब योजनेसह राज्य व केंद्र शासनाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला.

 

मागीलवर्षी साडेबारा हजार नागरिकांनी शहरी गरिब योजनेचे कार्ड काढले होते.
या कार्ड धारकांची इन्कम टॅक्स विभागाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
परंतू गोपनीय कायद्यामुळे त्यांच्याकडून माहिती न मिळाल्याने महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडील नोंदींनुसार तपासणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
यामध्ये ६२२ कार्ड धारकांच्या नावाने शहरात मिळकती असल्याचे निदर्शनास आले असून ते सर्वजण नियमित मिळकत कर भरतात.
अजून साडेसहा हजार कार्ड तपासणीचे काम सुरू आहे.

ज्या कार्डधारकांच्या मिळकती आढळून आल्या आहेत.
त्यांना व त्यांच्या कुटुंबियांकडे खुलासा मागविण्यासाठी नोटीस पाठविण्यात येणार आहे.
यामध्ये ज्यांचे उत्पन्न एक लाखांच्यावर असल्याचे आढळल्यास पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

शहरातील ‘त्या’ ११ मोठ्या रुग्णालयात यापुढे शहरी गरिब योजना नाही !
महापालिकेच्या PMC  सर्व योजनांचा एकत्रित अभ्यास करण्यात येत आहे.
यामध्ये शहरातील काही मोठ्या रुग्णालयांमध्ये राज्य शासनाची महात्मा फुले जन आरोग्य योजनाही लागू होते.
या योजनेअंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार केले जातात.
त्यामुळे शहरातील अशा ११ मोठ्या रुग्णालयांमध्ये यापुढे महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गतच उपचार मिळवून देण्यासाठी महापालिका प्रयत्न करणार आहे.
राज्य शासनाची ५ लाख रुपयांची योजना असताना महापालिकेची योजना पुन्हा राबविणे संयुक्तिक नसल्याने या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी शहरी गरिब योजनेतून मदत दिली जाणार नाही.
अशी माहिती रुबल अग्रवाल यांनी दिली.

Also Read This : 

खासदार नवनीत राणांची CM ठाकरेंवर जळजळीत टीका, म्हणाल्या – ‘तुम्ही लायक असता तर दिल्लीत येण्याची गरजच नव्हती’

फाटलेल्या टाचा काही दिवसातच होतील ‘मुलायम’, वापरा हे DIY Foot Mask

कामाची गोष्ट ! App बनावट आहे कि Fake? डाउनलोड करण्यापूर्वी ‘हे’ लक्षात ठेवा, अन्यथा…

त्वचा-आरोग्य आणि प्रतिकारशक्तीसाठी रामबाण उपाय आहे टोमॅटोचा रस; ‘या’ पध्दतीनं बनवा, मिळतील ‘हे’ फायदे, जाणून घ्या

राज्यात 28 मेपर्यंत 5126 लोकांना म्युकरमायकोसिसची लागण

Dahi-Kishmis Benefits : तंदुरूस्त रहायचे असल्यास दह्यामध्ये मनुक्यासोबत मिक्स करा फक्ती ‘ही’ एक गोष्ट, मिळतील आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या