Pune News : नाना पेठेत भरदिवसा 15 ते 20 जणांच्या टोळक्याकडून राडा, पोलिसांकडून 6 जणांना अटक तर 12 अल्पवयीन ताब्यात

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – नाना पेठेत भरदिवसा पंधरा ते वीस जणांच्या टोळक्याने एका सलूनच्या दुकानात येऊन तुफान राडा घातला. तर एका तरुणावर कोयत्याने वार करत टोळक्‍याने हातातील कोईते हवेत उंचावून ‘आम्ही नाना पेठेतील भाई आहोत’ असे म्हणत दहशत निर्माण केली. गर्दीच्या वेळी मोठ्या प्रमाणात या टोळक्याने गोंधळ घातल्यानंतर परिसरात एकच धावपळ उडाली होती. पोलिसांनी 6 जणांना अटक करत 12 अल्पवयीन मुलांना पकडले.

सनी विनोद महापुरे (वय 19, रा. रघुवंश अपार्टमेंट, फाले नगर, कात्रज पुणे) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ऋषिकेश जालिंदर कांबळे (वय 21), प्रतीक युवराज शिंदे (वय 18) यश संजय चव्हाण (वय 20), स्वराज निलेजय वाडेकर (वय 20) वैभव नितीन शहापूरकर (वय 20) आणि देविदास बाळासाहेब गालफाडे (वय 22) अशी अटक करण्यात आलेल्याचे नावे आहेत. त्यांच्या 6 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे नवी पेठ येथील हत्ती गणपती मंदिरजवळ सलून आणि टॅटूचे दुकान आहे. चार दिवसांपूर्वी (दि. 21 फेब्रुवारी) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास टोळके हातात कोयते घेऊन दुकानात शिरले. कुठे आहे तो केम असे ओरडत, राडा घालण्यास सुरुवात केली. तर फिर्यादीचा आतेभाऊ आदर्श मिसाळ याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर एकाने याला जिवंत सोडायची नाही, असे म्हणत कोयत्याने वार केले. पण, त्याने तो वार हुकवला व भीतीपोटी दुकानातून पळ काढला. त्यानंतर आरोपींनी दुकानाची तोडफोड केली.

त्यानंतर दुकानाच्या बाहेर येत टोळक्याने हातातील कोयते हवेत उंचावून दहशत निर्माण केली. तसेच आम्ही “नाना पेठेतील भाई आहोत, आमच्या नादाला कोणी लागू नका. एका एका ला कापून टाकू” अशी धमकी देऊन आम्ही “केएमला सोडणार नाही, आता तो सापडला नाही, सापडला असता तर त्याला दाखविले असते” असे बोलून तेथील लोकांच्या मनात दहशत निर्माण केली. अचानक घडलेल्या या दहशतीने नागरीक घाबरून दुकानांची शटर बंद केली व तेथून पळ काढला. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास विश्रामबाग पोलिस करत आहेत.