Pune News : गतवर्षी हातात तलवार घेऊन दुचाकीवरून फिरणारा व्हिडीओ व्हायरल करणार्‍याच्या मुसक्या आवळल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  गेल्या वर्षी (2020) हातात तलवार घेत दुचाकीवर फिरत त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हडपसर परिसरात हा प्रकार घडला होता.

याप्रकरणी दादा बाळू धुमाळ (वय 25) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गजानन मारणे याच्या कारागृहातून बाहेर येताना रॅली काढून त्याचे स्टेट्स ठेवत व सोशल मीडियावर व्हायरल केले गेले होते. याची गंभीर दखल यानंतर पोलिसांनी घेतली. सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशत निर्माण केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार हा गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

प्रकरण हे 2020 मधील आहे. त्याने दुचाकीवर हातात तलवार घेऊन त्याचा एक व्हिडिओ तयार केला. तसेच तो आता व्हायरल केला, असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यामुळे गुन्हा दाखल केला असल्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी सांगितले आहे.

दरम्यान सोशल मीडियाचा भाईगिरी आणि गुन्हेगारीचे उदात्तीकरण करण्यासाठी वापर होत असल्याचे काही वर्षांपासून दिसून येत. पण आता पुणे पोलिसांनी यावर कारवाई करण्याचे ठरवले असल्याने चांगलीच धडकी भरली आहे.