Pune News : रस्ता सुरक्षा सप्ताहामध्ये पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले रक्तदान

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहर वाहतूक विभागाच्या वतीने आज रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त रक्तदान शिबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबाराचे उद्घाटन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते झाले.

यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी देखील रक्तदान केले.पोलीस मुख्यालयात पोलीस रुग्णालयात हा रक्तदान शिबीर संपन्न होत आहे. आज त्याचे उद्घाटन झाले. ३२ व्या रस्ता सुरक्षा अभियान यंदा पार पडत आहे. त्याचा प्रारंभ सोमवारी झाला.

सात दिवस विविध कार्यक्रम यानिमित्ताने शहर वाहतूक विभागाकडून घेतले जात आहेत. या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, वाहतूक शाखेचे उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्यासह वाहतूक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.