Pune News : खडक, विश्रामबाग, फरासखाना, बिबवेवाडी, विश्रांतवाडीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, तर काही API आणि PSI चा देखील समावेश

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहर पोलीस दलातील आज अंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह  अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव यांची गुन्हे शाखेत बदली झाली आहे. तर पोलीस निरीक्षक श्रीहरी भैरट यांची खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली आहे.

बदली झालेले पोलीस उपनिरीक्षक

अभिजित सुभाष चौगुले- (विश्रामबाग पोलीस ठाणेते पुणे मनपा अतिक्रमण), वैशाली ईश्वर सुळ- (खडकी ते येरवडा पोलीस ठाणे) किरण विठ्ठल वराळ- (चंदननगर ते शिवाजीनगर पोलीस ठाणे), सचिन अशोक जाधव- ( चंदननगर ते विमानतळ पोलीस ठाणे), मोहनदास जाधव- (चतृशृंगी ते फरासखाना पोलीस ठाणे), राकेश सदाशिव सरडे- (चतृशृंगी ते विश्रामबाग पोलीस ठाणे), अमोल बबन भोसले- (खडकी ते लष्कर पोलीस ठाणे),

सचिन विकास पवार- (खडकी ते बंडगार्डन पोलीस ठाणे) 

बदली झालेले सहाय्यक निरीक्षक 

सुदर्शन सुदाम गायकवाड- (नागपुर शहर ते उत्तमनगर पोलीस ठाणे), सविता हनुमंत भागवत- (डेक्कन ते विश्रामबाग), विजयकुमार गोरख शिंदे- (शिवाजीनगर ते हडपसर पोलीस ठाणे)

बदली झालेले पोलीस निरीक्षक 

श्रीहरी रामचंद्र बहिरट- (अहमदनगर बदलीवर हजर ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक खडक पोलीस ठाणे), विजय शंकर टिकोळे- (गुन्हे शाखा ते वरिष्ठ निरीक्षक विश्रामबाग पोलीस ठाणे), दादासाहेब चुडाप्पा- (विश्रामबाग वरिष्ठ निरीक्षक ते वाहतूक शाखा), भरत जाधव – (वरिष्ठ निरीक्षक खडक ते गुन्हे शाखा), रवींद्र  कदम- पोलीस निरीक्षक विश्रांतवाडी पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष), दादा गायकवाड – (फरासखाना पोलीस निरीक्षक गुन्हे ते चतृशृंगी पोलीस ठाणे), कुमार घाडगे- ( वरिष्ठ निरीक्षक बिबवेवाडी पोलीस ठाणे ते आर्थिक व सायबर गुन्हे शाखा), सुनील झावरे – (गुन्हे शाखा ते बिबवेवाडी पोलीस ठाणे)